झुकरबर्गला चूक मान्य : डेटा लीक होणं म्हणजे युजर्सच्या विश्वासाला तडा
५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी निर्माता मार्क झुकरबर्गने आपली चूक मान्य केली आहे. युजर्सच्या माहितीची जबाबदारी आमची असल्याचेही त्याने म्हटले. डेटा लीक होणं हे विश्वासाला तडा जाण्यासारख असल्याचही त्याने म्हटलय.
नवी दिल्ली : ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी निर्माता मार्क झुकरबर्गने आपली चूक मान्य केली आहे. युजर्सच्या माहितीची जबाबदारी आमची असल्याचेही त्याने म्हटले. डेटा लीक होणं हे विश्वासाला तडा जाण्यासारख असल्याचही त्याने म्हटलय.
ट्रम्पना मदत
५ कोटी युजर्सची माहिती लीक झाल्याचा आरोप 'ब्रिटीश डेटा विश्लेषण कंपनी' कॅम्ब्रिज एनालिटीका कंपनीवर आहे.
राजकारण्यांच्या मदतीसाठी याचा उपयोग केला जातोय. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रेक्सिट अभियानात याचा उपयोग केला गेल्याचा आरोप करण्यात आला.
कायदेशीर कारवाई
२०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुक अभियानासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने फेसबूकने ५ कोटी युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा डेटा पुरविल्याचा आरोप आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुक आणि कॅंब्रिज एनालिटिका दोघांवरही युरोपीयन संघ, ब्रिटेनसहित अमेरिकेत कायदेशीर कारवाई सुरू आहे.