नवी दिल्ली : चीन आणि इराण हे शत्रूंची हेरगिरी करण्यासाठी फेसबुकचा वापर करत आहेत. एका फेसबुक व्हिसलब्लोअरने (Facebook Whistleblower) ही माहिती अमेरिकन काँग्रेसला दिली आहे, ज्याने आधी फेसबुकचे गुप्त अंतर्गत दस्तऐवज लीक केले होते आणि युजर्सच्या मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम उघड केला होता. 


फेसबुकचं अपयश राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मेलच्या अहवालानुसार, 37 वर्षीय डेटा अभियंता फ्रान्सिस हॉगेन हे अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलची मेन सोर्स आहे. ज्यांनी मे महिन्यात फेसबुक सोडून दिलं. त्यांनी कंपनीच्या वर्तनाचा खुलासा केला आहे म्हणतंय की, सरकारला साईट कशी वापरली जाते याचं त्यांना थेट ज्ञान होतं. 


त्या म्हणाले की, परदेशी सरकार सोशल नेटवर्कचा वापर कसा करतात याचे निरीक्षण करण्यात फेसबुकचं अपयश अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.


फ्रान्सिस हॉगेनने सांगितलं की, फेसबुकमुळे लोक एकमेकांचा तिरस्कार करू लागतात आणि कधीकधी यामुळे दंगलीसारख्या घटनाही घडतात. हॉगेनच्या मते, कंपनीला याची चांगली जाणीव आहे आणि फेसबुककडेही अशी प्रणाली आहे, ज्याच्या मदतीने द्वेषयुक्त सामग्री पसरवण्यापासून रोखता येतं. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या निवडणुकांदरम्यान फेसबुकनेही या तंत्रज्ञानाचा वापर केला होता, पण त्यामुळे फेसबुकच्या जाहिराती कमी झाल्या आणि त्यामुळेच निवडणूक संपताच यंत्रणा बंद झाली. फेसबुक जाहिरातींमधून दरवर्षी 6 लाख 30 हजार कोटी रुपये कमवते.


भारतातही फेसबुकवरून भडकली हिंसा


जिथे हिंसाचार उफाळून येतो, दंगली होतात, लोक एकमेकांविरुद्ध द्वेष पसरवतात किंवा भारतासह संपूर्ण जगात सरकारांविरोधात निदर्शनं होतात. त्यापैकी बहुतेक वेळा सुरुवात ही फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे होते. 


इन्स्टाग्रामचा मुलींच्या मनावर वाईट परिणाम होतोय


अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने एका अहवालात दावा केला आहे की, फेसबुकला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, इंस्टाग्रामचा 18 वर्षाखालील मुलींच्या मनावर वाईट परिणाम होतो, कारण या व्यासपीठावर आल्यानंतर ते त्यांचे शारीरिक रचना चेहरा याचा मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.


यासंदर्भात इन्स्टाग्रामद्वारे एक गोपनीय सर्वेक्षण करण्यात आलं, ज्यामध्ये 32 टक्के किशोरवयीन मुलींनी कबूल केलंय की त्यांना त्यांचं शारीरिक रूप आवडत नाही. अनेक मुलींनी असंही कबूल केलं की, त्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले त्यांचे फोटो आवडत नाही आणि त्यांना वाटतं की, त्यांनी आत्महत्या करावी. 


असं असूनही, इंस्टाग्रामला 13 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणायचं होतं. मात्र, वादानंतर ही योजना रद्द करण्यात आली.