नवी दिल्ली: सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus)जगभरात थैमान घालत असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याल कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास (Work from home) सांगितले आहे. साहजिकच यामुळे कोरोनाच्या दहशतीखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, फेसबुकने यापुढे जात आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना थोडाथोडका नव्हे तर १००० डॉलर्सचा (तब्बल ७४ हजार) बोनस जाहीर केला आहे.  Work from home चा पर्याय स्वीकारून कोरोनाला पायबंद घालण्यात कंपनीची मदत केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वर्क फ्रॉर्म होम' नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई


सध्याच्या घडीला फेसबुकचे जवळपास ४५ हजार कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. या प्रत्येकाला एप्रिल महिन्यात १ हजार डॉलर्सचा बोनस मिळेल. परंतु, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार नाही. काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या लंडनमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर फेसबुककडून सिंगापूर आणि लंडनमधील कार्यालय बंद करण्यात आले होते. कंपनीने सिएटल आणि बे एरियातल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


कोरोनापुढे पाकिस्तान हतबल; विकसित देशांकडे मदतीची याचना


याशिवाय, करोना व्हायरसने प्रभावित झालेल्या छोट्या व्यवसायिकांना मदत फेसबुक मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी  ३० देशांतील ३० हजार छोट्या व्यवसायिकांना ७४१ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.