मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबूकने चांगलीच कंबर कसली आहे. यासाठी फेसबुकने एक 'वॉर रूम' स्थापन केला आहे. चुकीच्या बातम्या रोखण्यासाठी कर्मचारी दिवस-रात्र काम करणार आहेत. फेसबूकने कर्मचाऱ्यांना जागेवरच जेवण करण्यासाठी सांगितलं असून फक्त शौचालयाला जाण्याची परवानगी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकने यासाठी तयार केलेलं वॉर रूम जगासमोर आणलं आहे. ब्राझीलमध्ये २८ ऑक्टोबर तर अमेरिकेत ६ नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने फेसबूकने ही तयारी केली आहे. डेटा चोरीमुळे अनेक टीका सहन करणाऱ्या फेसबुकने आता अशा घटना रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. 


कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथील फेसबूकच्या मुख्य कार्यालयात हे वॉर रूम स्थापन करण्यात आले आहे. जवळपास 25 जणांची टीम यावर सतत लक्ष ठेवणार आहे. दोन्ही देशातील वेळेनुसार घड्याळ सेट करण्यात आले असून कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पोस्टरर्स देखील लावण्यात आली आहेत.


खोटी माहिती आणि बातम्या थांबवण्यासाठी ही संपूर्ण टीम कार करणार आहे. निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ ऩये म्हणून कोणत्याही चुकीची पोस्ट एका तासाच्या आत हटवण्याचं काम ही टीम करणार असल्याचं या टीमच्या प्रमुखांनी सांगितलंय.