मुंबई : तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.  दिवसातून 2-3 वेळा आपण चहा पितोच. या चहामधून तुमच्या पोटात घातक केमिकल्स जातायत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय.  गरमागरम चहा हा अनेकांचा विक पॉइंट. हेल्थ कॉन्शस लोकं ग्रीन टी, लेमन टीच्या प्रेमात असतात. पण हा चहा तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम करतोय का, असा सवाल आता उपस्थित झालाय. (fact check pesticide in tea know what truth what false) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय चहामध्ये कीटकनाशकांचं घातक प्रमाण असल्याचं समोर आलंय. श्रीलंकेमधील अस्थीर परिस्थितीमुळे तिथल्या चहाची निर्यात कमी झालीये. त्यामुळे भारतीय व्यापारी युरोप-अमेरिकेत निर्यात वाढवण्याच्या खटपटीत आहेत. 


मात्र निश्चित प्रमाणापेक्षा जास्त कीटकनाशकं असल्याचं सांगत चहाचा मोठा लॉट परत पाठवण्यात आलाय. भारतीय चहा निर्यातदार संघाचे अध्यक्ष अंशुमन कनोरिया यांनी स्वतः ही माहिती दिलीये.


गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलांमुळे चहाच्या रोपांवर किडींचा हल्ला होतोय. नुकसान टाळण्यासाठी बागायतदार किटकनाशकांचा वापर करतात.  फवारणीनंतर 10 ते 20 दिवसांच्या आत पानं तोडल्यास चहापत्तीत किटनाशकांचा अर्क राहतो. 


युरोपियन युनियनचे सुरक्षेबाबत निकष हे भारतीय संस्था FSSAIपेक्षा कितीतरी कडक आहेत. युरोपच्या निकषांवर चहानिर्मिती करण्याऐवजी अनेक उद्योजक हे FSSAIला निकष शिथील करण्याचा आग्रह धरत असतात. 


मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात पाय रोवायचा असेल, तर आरोग्याशी तडजोड करून चालणार नाही. शिवाय भारतीय मोठ्या प्रमाणात चहा रिचवत असताना त्यांच्या आरोग्याशी खेळणंही योग्य नाही. निर्यात वाढवायची असेल आणि स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर चहा बागायतदार, उद्योजकांना आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करावंच लागेल.