मुंबई : स्मार्टफोन आल्यापासून अनेकांना सेल्फीचा नाद लागला. आपण कुठे आहोत, काय करतोय, परिस्थितीचं भान न राखता तरुण बिंधास्तपणे सेल्फी काढतात. अशाच सेल्फी काढणाऱ्या 2 जणांना चांगलंच अंगाशी आलंय. बाईकवरुन फिरणाऱ्या तरुणांचा सेल्फीच्या नादाता अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात जख्मेवरच निभावलं. या अपघाताच्या थराराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (fact check viral polkhol attempt to take a selfie while standing on a bike accident of  2 youngsters)


नक्की काय झालं? 


बाईकवरून फेरफटका मारत असताना बाईकवर उभं राहून हा तरुण सेल्फी काढत होता. तर दुसरा तरुण बाईकवर उलट्या दिशेनं तोंड करून बसला होता. पण, सेल्फी काढताना याचा बॅलन्स बिघडला आणि तो चालत्या बाईकवरून खाली कोसळला. तर दुसरा पुढे जाऊन पडला. यात दोघेही बाईकवरून पडल्याने जखमी झाले.