मुंबई :  तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल की एखाद्या बिअरच्या ट्रकला अपघात झाला तर लोक आधी बिअर पळवण्यासाठी झुंबड करतात. पण, बिअरच्या ट्रकमधून 2 हजार बाटल्या रस्त्यावर पडल्यानंतर तिथल्या लोकांनी जे काम केलं ते पाहुन तुम्हीही अवाक् व्हाल. असं काय केलं तिथल्या लोकांनी. चला पाहुयात. (fact check viral polkhol beer truck crash video gose viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगानं ट्रक चालला होता. पण, वळणावर ट्रक आला आणि ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं. बघा काय झालं. ट्रकमधल्या बिअरच्या बाटल्या पाऊस पडावा तशा रस्त्यावर पडल्या.  बघता बघता रस्त्यावर बिअरचा महापूर आला. आता पुन्हा एकदा पाहा, इथे काय घडलं. 


वळण घेताना या ट्रकमधून तब्बल 2 हजार बाटल्या रस्त्यावर पडल्या. रस्त्यावर सगळीकडे बिअर बॉटलच्या काचांचा थर पसरला.  यानंतर काही लोक धावत आले. यांना पाहिल्यानंतर वाटलं हे बिअरच्या बॉटल पळवण्यासाठी आले असावेत. पण, इथे घडलं वेगळंच. 


सगळ्यांनी मिळून रस्त्यावर पडलेल्या बॉटल हटवण्यास सुरूवात केली.  बघता बघता, सगळ्या तुटलेल्या बॉटल या लोकांनी रस्त्यावरून हटवल्या. ड्रायव्हरच्या छोट्या चुकीमुळे ट्रकमधील 2 हजार बिअरच्या बॉटलचा चक्काचूर झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. ही घटना दक्षिण कोरियातील आहे.


भारतात बिअरच्या ट्रकला अपघात झाल्यावर आधी बिअर पळवण्यासाठी झुंबड उडताना पाहणं तसं नवीन नाही. मात्र इथे तसं न होता लोकांनीच रस्त्यावरील काचा हटवल्या. बिअर कंपनीनं यांचा शोध घेऊन मदत करणाऱ्यांचे आभार मानले.