Ducks In Vineyard: द्राक्षबागेच्या रक्षणासाठी भन्नाट आयडिया, तुम्ही विचारही केला नसेल, फक्त एवढं करा...
Fantastic idea for protecting the vineyard: मालकांना पिकांचं संरक्षण करण्यासाठी या बदकांची मोठी मदत होते. बदकांना द्राक्षमळ्याचे सैनिक म्हणतात. तलांब पाय आणि मान सरळ असल्यानं ही बदकं द्राक्षाच्या मळ्यातील पानांमधून गोगलगाय सहज शोधून काढतात.
DUCK CROP PEST : शेतात किटक (Insect) येऊ नयेत, पीकाला कीड किंवा मुंग्या लागू नयेत म्हणून आपण किटकनाशकांची (Pesticides) फवारणी करतो. मात्र दक्षिण आफ्रिकेत (SA) एका शेतकऱ्यानं पिकांना किटकमुक्त ठेवण्यासाठी चक्क बदकांची फौज तैनात (Ducks In Vineyard) केलीय. ही बदकं नेमकं करतात तरी काय?, असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. पांढऱ्या, काळ्या आणि तपकिरी रंगाच्या बदकांचे हे कळप (flock of ducks). एखाद्या सैन्यात जशी शिस्त पाहायला मिळतं तशीच शिस्त या बदकांमध्येही पाहायला मिळते.
किटक नियंत्रणासाठी बदकांचा उपाय (Duck Remedies for Pest Control)
विशेष म्हणजे या बदकांवरही सैनिकांप्रमाणेच जबाबदारी सोपवण्यात आलीय ती म्हणजे द्राक्षमळ्याच्या रक्षणाची... आता तुम्हाला प्रश्न पडेल बदकं या द्राक्षाच्या बागेचं रक्षण करतात म्हणजे नेमकं काय करतात... तर ही बदकं किटक नियंत्रणाचं काम करतात. दक्षिण आफ्रिकेच्या स्टेलेनॉश इथल्या द्राक्षबागांमध्ये ही बदकं मोलाची भूमिका बजावतायेत. ही बदकं द्राक्षबागेत नियमितपणे गस्त घालतात आणि गोगलगाय तसच किड्या, मुंग्यांचा फडशा पाडतात.
मालकांना पिकांचं संरक्षण करण्यासाठी या बदकांची मोठी मदत होते. बदकांना द्राक्षमळ्याचे सैनिक म्हणतात. तलांब पाय आणि मान सरळ असल्यानं ही बदकं द्राक्षाच्या मळ्यातील पानांमधून गोगलगाय सहज शोधून काढतात. त्यामुळे द्राक्ष्याच्या पिकाचा बचाव होतो.
विशेष म्हणजे या बदकांचा दिनक्रमही ठरलेला असतो. दररोज सकाळ आणि संध्याकाळी ही बदकं नियमितपणे द्राक्षांच्या बागेत जातात आणि आपल्याला नेमून दिलेलं काम चोखपणे बजावून पुन्हा शेल्टरमध्ये परततात. आपल्याकडे किटक नियंत्रणासाठी शेतात फवारणी केली जाते. मात्र दक्षिण आफ्रिकेतील हा अभिनव प्रयोग निश्चितच वेगळा आहे. यातून विषमुक्त शेतीतर होतेच शिवाय निसर्गाचा समतोलही राखला जातोय.