Chikoo Benefits: ब्रेस्ट फीडिंगपासून ते किडनी स्टोनपर्यंत... 'या' फळात आहेत 14 पोषक गुणधर्म

Benefits of Chikoo: आम्ही ज्या फळाबद्दल बोलतोय ते फळं आपण अनेकदा आवडीनं खात असतो. ज्यातून तुम्ही 14 गुणांचा फायदा मिळतो. हे गुण फक्त तुमच्या शारिरीक फायद्याचे नाहीत तर मोठ्या आजारांपासूनही ते तुम्हाला दूर ठेवतात. 

Updated: Jan 28, 2023, 06:00 PM IST
Chikoo Benefits: ब्रेस्ट फीडिंगपासून ते किडनी स्टोनपर्यंत... 'या' फळात आहेत 14 पोषक गुणधर्म title=

Benefits of Chikoo: फळांचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्येक फळामध्ये एक नाही तर अनेक नैसर्गिक गुण आणि सत्त्वे (Fruit Benefits for Body) असतात. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये आपण नेहमी फळांचा समावेश करतो.  त्याचबरोबर नुसती फळंच नाही तर फळांचे जुसही करून आपण पितो. आपल्या डाएटमध्ये वजन कमी करण्यासाठी आपण फ्रुट ज्यूसेसचा आपल्या आहारात समावेश करून घेतो. पण तुम्हाला माहितीये का की आम्ही ज्या फळाबद्दल सांगणार आहोत त्यात एक नाही तर तब्बल चौदा गुण आहेत. (these are the benefits of sapodilla fruit for your body from breastfeeding to kidney stone)

तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की हे फळं कोणतं आणि त्यानं आपल्याला कोणते कोणते फायदे आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आम्ही ज्या फळाबद्दल बोलतोय ते फळं आपण अनेकदा आवडीनं खात असतो. ज्यातून तुम्ही 14 गुणांचा फायदा मिळतो. हे गुण फक्त तुमच्या शारिरीक फायद्याचे नाहीत तर मोठ्या आजारांपासूनही ते तुम्हाला दूर ठेवतात. 

या फाळाचे नावं आहे चिकू. ज्याला सपोडिला (Sapodilla) असंही म्हटलं जाते. या  लेखात आपण जाणून घेऊया की चिकू खाण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत. या लेखातून आपण चिकूपासून कसा बचाव मिळेल हे सांगणार नाही आहोत तर तुम्हाला वाईट रोगांपासून कसा बचाव होऊ शकतो याबद्दल सांगणार आहोत. चिकूमध्ये व्हिटॅमिन, मिनरल आणि एन्टी ऑक्सिडन्ट्स असतात जे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगले आणि फायदेशीर असतात. 

चला तर मग जाणून घेऊया त्या 14 गुणधर्मांविषयी... 

1. केसांसाठी फायदेशीर - 
तुम्ही चिकू खायला सुरूवात केलीत तर तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होते. तुमचे केस मुलायम होण्यास मदत होते. जर तुम्ही चिकूच्या बियांपासून येणारे तेल लावते तर तुम्हाला असणारा त्रासही कमी होऊ शकतो. 

2. त्वचेसाठी फायदेशीर - 
चिकूचे सेवन आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई, ए आणि सी असते. ज्याचा फायदा तुमच्या त्वेचेला होऊ शकतो. चिकूमध्ये मॉश्चराझिंगचे गुणही असतात ज्यानं तुमची त्वचा चांगली मॉश्चराईझ होण्यास मदत होते. तुम्हाला एन्टी एजिंग क्रीमचीही काहीच गरज नाही कारण चिकू त्याचे काम करते. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चिकूमध्ये पोलिफेनोल आणि फ्लेवोनॉईड कंपाऊंडही असतात ज्यानं तुमच्या त्वचेला मदत होते. 

3. सर्दी आणि खोकल्यापासून आराम - 
जर तुम्हाला खोकला किंवा पडसं झालं असेल तर त्यावर तुम्ही चिकूला तुमच्या आहारात घेऊ शकता. चिकू खाल्ल्यानं क्रोनिक कफ मधून आराम मिळतो. 

4. इम्यूनिटी वाढवते - 
चिकूमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमची इम्यूनिटी वाढते आणि त्यातून तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून वाचता येते. 

5. हाडं मजबूत होतात - 
हाडं मजबूत होण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन अशी पोषक तत्त्वांची गरज असते जे चिकूमध्ये असतात. त्याचसोबत चिकूमध्ये मॅगनीज, जिंकही असते ज्यानं तुमची हाडं मजबूत होतात आणि त्यामुळे तुम्हाला हाडांच्या कुठल्याही समस्या उद्भवतं नाहीत. 

6. दातांसाठी फायदेशीर - 
तुमच्या दातांमध्ये कॅव्हिटी असेल तर त्यासाठी चिकू खाणं हे उत्तम ठरू शकतं. दातांमध्ये बॅक्टेरिया दूर होतात. चिकूमध्ये लाटेकस असते ज्यानं तुमच्या दातांना फायदा होतो. 

7. प्रेग्नंट महिलांसाठी फायदेशीर -
चिकूमध्ये कार्बोहायड्रेट, साखर आणि व्हिटॅमिन सी असते जे ब्रेस्टफीडिंगसाठी आवश्यक असते. चिकूमधील आयरन आणि फोलेटही गर्भावस्थेतील स्त्रियांना एनीमियासारख्या आजारांपासूनही बचाव करतात. 

8. पचनक्रियेसाठी फायदेशीर - 
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला पचनाचाही त्रास होतो आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही चिकू खाऊ शकता. तेव्हा चिकू तुम्हाला चांगल्या प्रकारे या समस्येपासून मदत करू शकतो. 

9. एनर्जी मिळते - 
चिकूमुळे तुम्हाला शरीरात एनर्जी मिळते. यामधील कार्बोहायड्रेट तुमच्या शरीरात ताकद निर्माण करते. चिकूमध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोस नावाची शुगरही असते. 

10. किडनी स्टोनसाठी फायदेशीर - 
आजकाल किडनी स्टोनच्या समस्याही वाढताना दिसत आहेत. तेव्हा यापासून वाचण्यासाठी तुम्हाला चिकू खाणं फायदेशीर ठरेल. चिकूमध्ये ड्यूरेटिक असते ज्यामुळे तुम्हाला मुत्रपिंडाचे त्रास होत नाहीत. 

11. कॅन्सरपासून बचाव - 
चिकू खालल्यानं तुम्हाला कॅन्सरसारखे रोग होत नाहीत. त्याचबरोबर यामुळे तुम्ही धोकादायक आजारापासून वाचू शकता. 

12. आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं -
चिकूमध्ये आयरन असते त्यामुळे तुमचा मेंदूही तंदुरूस्त राहतो. यामुळे भिती, डिप्रेशन आणि बैचेनी तसेच चिडेचिडेपणाही कमी होण्यास मदत होते. 

13. बल्ड प्रेशरही कमी होते - 
चिकूमध्ये मॅग्नेशियम असते आणि ज्यामुळे तुम्हाला रक्तदाबात मदत होते. यात पोटॅशियमही असते ज्यानं ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. 

14. वजन कमी होते -
चिकू खाल्ल्यानं तुमचे वजनही नियंत्रित राहते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)