‘माझ्या शेतात टॉपलेस फोटोशूट बंद करा!’ संतप्त शेतकऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Stop Posing Naked In Sunflower Fields: या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेताच्या बांधांवर शेतात कपडे काढून फोटोशूट करु नये असा इशारा देणारे फलक लावले आहेत. सोशल मीडियावरुनही याबद्दलची पोस्ट या शेतकऱ्याने ग्राहकांना आणि पर्यटकांना विनंती करण्याच्या उद्देशाने लिहिली आहे.
Stop Posing Naked In Sunflower Fields: 'आमच्या शेतात कपडे काढून (टॉपलेस होऊन) न्यूड फोटो शूट करु नका' असा इशाचा शेताच्या बांधावर लावण्याची वेळ एका शेतकऱ्यावर आली आहे. इंग्लंडमधील एका शेतकऱ्याला त्याच्या शेताबाहेर हा इशारा लावावं लागण्याचं कारण म्हणजे त्याच्या मालकीच्या सूर्यफुलाच्या शेतामध्ये अनेक महिला टॉपलेस होऊन फोटोशूट करतात. यामुळे शेताचंही नुकसान होत आहे.
न्यूडीटीवर बंदी असल्याची आठवण करुन दिली
फुलांच्या शेतात मॉडेल्सने केलेल्या फोटोशूटचे अनेक फोटो तुम्ही बऱ्याचदा टेबल कॅलेंडर्सवर पाहिले असतील. याचवरुन 2003 साली हॉलिवूडमध्ये 'कॅलेंडर गर्ल्स' नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. हल्ली सोशल मीडीयावर पोस्ट करण्यासाठी अनेकदा असे हटके फोटो काढून लाईक्ससाठी ते पोस्ट केले जातात. मात्र सोशल मीडियावरील या अती उत्साही लोकांना इंग्लंडमधील हँट्स येथील हेलिंग बेटावरील एका सूर्यफुलाच्या शेतकऱ्याने चांगलाच डट्ट्या लगावला आहे. सूर्यफुलांच्या शेतात जाऊन न्यूड फोटोशूट करणाऱ्यांना या शेतकऱ्याने न्यूडीटीवर बंदी असल्याची आठवण करुन दिली आहे.
एका लहान मुलाने या शेतात महिलेला केवळ अंडवेअरमध्ये पाहिलं
या शेतमालकाचं एक फार्म शॉप म्हणजेच शेतात पिकवलेलं तिथेच विकाणारं दुकान असून या दुकानाच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. "आमच्या असं निदर्शनास आलं आहे की आमच्या शेतांमध्ये बरेच लोक न्यूड फोटोग्राफी करतात. लोक जेव्हा शेतं पहायला येतात तेव्हा असं होता कामा नये," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या ठिकाणी आलेल्या शारा आणि जेन क्रडॅस यांनी त्यांच्या मुलाने एका महिलेला शेतात केवळ अंडरवेअर घालून पाहिल्याचं सांगितल्याचं वृत्त 'द सन'ने दिलं आहे. या दुकानामध्ये एक महिला न्यूड फोटोशूटनंतर विसरुन गेलाला काळ्या रंगाचा ब्रा सुद्धा उपहासात्मकरित्या विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं सांगत डिस्प्लेला ठेवला आहे.
पण इथं असे फोटो का काढले जातात?
या दुकानाने काही आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्यमातून कॅन्सरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी टॉपलेस होत न्यूड फोटो शूट या सूर्यफुलाच्या शेतात केलं होतं. तेव्हापासूनच इथे येणारे अनेक पर्यटक खास करुन महिला टॉपलेस होऊन फोटोशूट करताना दिसत आहेत. "आमच्या शेतामध्ये अशापद्धतीने फोटो काढणे फारच लज्जास्पद आहे. गंमतीसाठी अशी जोखीम घेऊन होणारं फोटो शूट लाजीरवाणा प्रकार आहे," असं या दुकानाचे संचालक सॅम विल्सन यांनी म्हटलं आहे. आमच्या शेतांमध्ये टॉपलेस होण्याची परवानगी नाही अशीही पोस्ट या फेसबुक पेजवरुन करण्यात आली आहे.
भेट द्या पण कपडे काढू नका
आमची सूर्यफुलाची शेतं पाहण्यासाठी येणाऱ्यांनी अंगावरील कपडे काढू नयेत, अशी सूचनाही आम्ही ग्राहकांना करतो असंही विल्सन म्हणाले.