इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची लाज थोडक्यात वाचली आहे. दहशतवाद्यांवर ऑक्टोबर अखेरपर्यंत कारवाई करा असा निर्वाणीचा इशारा एफएटीएफ अर्थात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला दिला आहे. गेल्या वर्षभरापासून एफएटीएफच्या ग्रे यादीत पाकिस्तान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैशांची अफरातफर रोखणं आणि दहशतवादाला पुरवला जाणारा पैसा रोखण्याबाबत त्यावेळी पाकिस्ताननं ग्वाही दिली होती. मात्र दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. याच आधारे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकलं जाणार अशी चर्चा होती.


पाकिस्तानला काळ्या यादीत टाकल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र एफएटीएफने ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिल्याने पाकिस्तानची लाच थोड्यात वाचली आहे.