नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरस डेल्टा व्हेरिएन्टच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डेल्टा व्हेरिएन्टच्या रूग्णांची वाढती संख्या  लक्षात घेत 21 जूननंतरही लॉकडाऊन आणखी 4 आठवड्यांसाठी वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांत ब्रिटनमध्ये 8 हजार 125 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. फेब्रुवारीनंतर एकाच दिवसातील सर्वाधिक रूग्ण संख्या असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड(पीएचई) यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात हा आकडा 42 हजार 323 पर्यंत पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटेन सरकारने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन ताज्या आकडेवारीचा अभ्यास करीत आहेत. ते सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करून सोमवारी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करू शकतात. सांगायचं झालं तर डेल्टा व्हेरिएन्ट सर्व प्रथम भारतात आढळला होता. 


कोरोनाच्या B.1.617.2 या व्हेरिएन्टचं नाव 'डेल्टा' असं ठेवलं आहे. भारतात अढळलेला B.1.617 स्ट्रेन आतापर्यंत 53 देशांमध्ये आढळून आला आहे. कोरोनाच्या  B.1.617 व्हेरिएन्टचे तीन प्रकार आहेत.  B.1.617.1, B.1.617.2 आणि B.1.617.3. मिळालेल्या माहितीनुसार वेग-वेगळ्या देशांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये 25 मे पर्यंत कोरोना व्हायरसच्या B.1.617 स्ट्रेनचे तीन प्रकार आढळले आहेत.