Bike Stunt Video:  मुंबईतील एका तरुणाचा स्टंबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.  या व्हिडिओत एक तरुण दोन तरुणींसोबत खतरनाक स्टंट करताना दिसत होता. या स्टंटबाजावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यानंतर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहे. मात्र, त्याची चांगलीच फजिती झाली आहे. कारण स्टंटबाजी करताना हा तरुण त्याच्या मैत्रीणीला घेवून आपटला आहे (Bike Stunt Video). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल झाला आहे. 'dbr.offroad' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक जण या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत. 


या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीला घेवून बाईक रायडिंग करत आहे. बाईकवर तो स्टंट मारताना दिसत आहे. भारधाव वेगात असलेली बाईकला तो व्हिली मारतो आणि त्याचे जजमेंट चुकते. भरधाव वेगात असलेल्या बाईकचा बॅलन्स बिघडतो.  मैत्रिणीला घेवून तो बाईकवरुन खाली पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. याचा लोकेशन काय? या व्हिडिओत दिसणारे तरुण तरुणी कोण आहेत याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.  


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by RN TRECHO (@bm.offroad1)


मुंबईतील स्टंटबाजावर कारवाई


सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओतील स्टंटबाजावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या व्हिडिओत एक तरुण दोन तरुणींन घेवून स्टंटबाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओत तरुणाने एका तरुणीला पुढे बसवले आणि दुसऱ्या तरुणीला मागे बसवले आहे. या दोघींना घेवून तो स्टंटबाजी करत होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तरुणाला अटक केली आहे. स्टंटबाजी रोखण्यासाठी पोलिस वारंवार जनजागृती करत असतात. तरीदेखील अनेकजण स्टंटबाजी करत असतात. या स्टंटबाजांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.