Elon Musk on Singapore : जगाचा अंत या एका मुद्द्यावर आतापर्यंत अनेक भाकितं, तर्कवितर्क लावण्यात आले. बाबा वेंगा असो किंवा नॉस्त्रेदमस असो. या मंडळींनी जगाच्या, विश्वाच्या अंतसमयाविषयीची केलेलं भविष्य एकिकडे सर्वांचं लक्ष वेधत असतानाच एका व्यक्तीनंही अशीच काहीशी भविष्यवाणी केली आहे. ही व्यक्ती म्हणजे एलॉन मस्क आणि त्यानं केलेली भविष्यवाणी आहे एका अशा देशाविषयीची जो येत्या काळात काही संकटांचा सामना करु शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मस्कनं ज्या देशाविषयीचं भविष्य सांगत चिंता वाढवली हा देश आहे, सिंगापूर. दक्षिण आशियाई द्वीपराष्ट्र अशी ओळख असणारा हा देश जगातील इतर देशांप्रमाणंच एका गंभीर समस्येचा सामना करत आहे. लोकसंख्या दरात होणारी घट आणि प्रजनन दराचं घटतं प्रमाण हे चित्र सिंगापूरमध्ये आणखी वाईट स्थितीत असून, अथं प्रजनन दर 0.97 इतक्या खाली घसरल्याचं अधिकृत आकडेवारी सुचवते. लोसकसंख्यादर संतुलित ठेवण्यासाठी प्रजनन दर 2.1 इतका असणं गरजेचं आहे. याच मुद्द्यावर एक पोस्ट करत मस्कनं महत्त्वाची बाब मांडली. 


X पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'सिंगापूरसह कैक इतर देशही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. न्यूजवीकनुसार सिंगापूरमध्ये प्रौढ आणि वयोवृद्धांची वाढसी संख्या, घटते श्रमिक आणि त्या तुलनेक कमी होणाऱ्या Labour Power मुळं इथं कारखान्यांपासून अन्नपुरवठ्यापर्यंतच्या कामांसाठी रोबोटचाच वापर केला जात आहे'. 


हेसुद्धा वाचा : Pushpa 2 फेम अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना किती शिकलेयत माहितीये? 


इंटरनेशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या माहितीनुसार सिंगापूरमध्ये दर 10 हजार कर्मचाऱ्यांमागे 770 रोबोट काम करतात. याच कारणास्तव इथं प्रत्येक ठिकाणी रोबो-क्लीनर, रोबो-वेटर, रोबोकॉप आणि रोबो डॉग पाहायला मिळतात. 1970 च्या दशकापर्यंत दक्षिण कोरिया, चीन आणि जपानमध्ये एक महिला सरासरी पाच मुलांना जन्म देत होती. पण, आता मात्र या देशांमध्ये एका महिलेमागे सरासरी एकाही मुलाची नोंद नाही. ही आकडेवारी पाहता मागील 50 वर्षांमध्ये संपूर्ण जगभरात प्रजनन दरात 50 टक्क्यांनी घट झाल्याचं स्पष्ट होत आहे. 


प्रजनन दर म्हणजे नेमकं काय? 


कोणताही देश, समाज किंवा समुदायातील महिला तिच्या जीवनकाळात किती बाळांना जन्म देते याची आकडेवारी म्हणजेच तो देश, समाज आणि समुहाचा प्रजनन दर. उदारहणार्थ, जर भारतातील एक महिला जर तिच्या संपूर्ण जीवनकाळात सरासरी तीन मुलांना जन्म देते तर भारताचा प्रजनन दर आहे 3.