Trending News : जुगाडू लोकांचे अनेक किस्से तुम्ही सोशल मीडियावर पाहिले आहेत. या लोकांचे जुगाडामुळे कोणाचे नुकसान पण होतं नाही आणि त्यांचं कामही होतं. तुम्ही बायकोसोबत सुट्टीवर जाण्याचा बेत आखला असेल आणि तिने अचानक सुट्टीवर येण्यास नकार दिला. तर तुम्ही काय कराल? अशावेळी तुम्ही पण सुट्टीचा प्लान रद्द कराल किंवा तुम्ही एकटे फिरायला जाणार. सध्या सोशल मीडियावर यातून मार्ग काढण्यासाठी एका नवऱ्याने भन्नाट जुगाड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिलिपीन्समधील रेमंड फॉर्टुनाडो हा व्यक्ती सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. रेमंड त्यांच्या बायकोसोत कोरोनला सुट्टीसाठी जाणार होते मात्र त्यांचा बायको जोआनेला अचानक काम आलं. त्यामुळे ती या सुट्टीवर जाऊ शकणार नव्हती. जोआने ही एक मॉडल आहे त्यामुळे तिला अचानक एक प्रोजेक्ट मिळालं त्यामुळे ती फिरायला नाही जाऊ शकली. त्यामुळे रेमंडने एकट्याने फिरायला जाण्याचं ठरवलं. मात्र बायकोसोबत फिरायला जाण्याचा त्याने वचन दिलं होतं. म्हणून मग रेमंडने जुगाड केला. त्यांनी उशीवर आपल्या बायकोच्या फोटो लावला आणि या उशीसोबत फिरायला गेला. 


रेमंडने ही सुट्टी उशीवर असलेल्या बायकोच्या फोटोसोबत आनंदात घालवली. या सुट्टीदरम्यान त्याने या उशीसोबत अनेक फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. रेमंडने 7 जुलैला फेसबुकवर हे फोटो शेअर केले. त्यानंतर ही पोस्ट 16 हजार लोकांनी शेअर केली आहे. तर 20 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केली आहे.