Finland PM Viral Video : फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन (Sanna Marin) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. फिनलँडच्या विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान सना मरीन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या ड्रग्स चाचणीचीही मागणी केली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सना मरीन यांनी मात्र ड्रग्स सेवन केल्याचा इन्कार केला आहे. पार्टीत केवळ दारू घेतल्याचं सना मरीन यांनी म्हटलं आहे. 


सोशल मीडियावर सना मरीन यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सना मरीन आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर डान्स करताना आणि गाणं म्हणताना दिसत आहेत. व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या आहेत. 


सना मरीन यांची प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, पार्टीत मोबाईलवरुन शुटिंग केलं जात असल्याची आपल्याला कल्पना होती, पण तो व्हिडिओ अशा पद्धतीने सार्वजनिक करण्यात आल्याचं आपल्याला दु:ख झाल्याचं त्यांनी म्हटलंय.


पार्टीत डान्स आणि गाणं म्हटल्याचं फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी मान्या केलं आहे. पण सर्व पूर्णपणे कायदेशीर गोष्टी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ड्रग्स सेवनाच्या आरोपाचा मात्र त्यांनी इन्कार केला आहे. आपण कधीही ड्रग्स घेतलं नाही आणि अशा कोणालाही ओळखतही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन यात फरक आहे, ही आपली वैयक्तिक बाब असल्याचं स्पष्टीकरणही सना मरीन यांनी दिली आहे. माझा काही वेळ मी मित्र-मैत्रिणींबरोबर घालवू शकते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 



'माझ्यात काही बदल करण्याची गरज नाही'
आरोप झाल्यानंतर सना मरीन यांनी आपल्या वागण्यात कोणताही बदल करण्याची गरज नाही, मी नेहमी आहे तशीच राहिन असं उत्तर विरोधकांना दिलं आहे. 


दुसरीकडे, फिनलंडच्या विरोधी पक्षनेत्या रिका पुरा यांनी सना मरीन व्हिडिओ लीक प्रकरणी जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान सना मरिन यांनी ड्रग्स चाचणी करावी अशी त्यांनी मागणी केल आहे.


कोण आहेत फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन
फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. जर्मन वृत्तवाहिनी बिल्डने साना मरीनला जगातील सर्वात कूल पंतप्रधान म्हणून घोषित केलं आहे.