न्यूयॉर्क : आग लागल्यानंतर काही सुचत नाही. सगळा गोंधळ उडतो अशावेळी काही चुका केल्या जातात ज्या टाळणं फार महत्त्वाचं आहे. आगीत होरपळू नये म्हणून जीव वाचवण्यासाठी नको ते धाडस करायला जातात. जे धाडस अंगाशी येत किंवा जीवावरही बेतू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमारतीमध्ये किंवा घरात आग लागली तर चुकूनही असं धाडस करू नका. कारण अशा धाडसामुळेच एकाला आपला जीव गमवावा लागला तर दुसऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. बहुमजली इमारतीला आग लागल्यानंतर दोन तरुणांनी जीव वाचवण्यासाठी आपला जीव पुन्हा धोक्यात टाकला.


इमारतीच्य़ा पाचव्या मजल्यावर आग लागल्यानंतर दोन युवकांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून लटकून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. आग वेगानं पसरत होती. जीव वाचवण्यासाठी बाहेर असलेल्या ड्रेनज पाईपवर दोन्ही युवक बराचवेळ लटकून राहिले होते. 


एकाचा हात सुटला तर दुसरा वाचवण्यासाठी पुढे आला. ही धक्कादायक घटना न्यूर्याकच्या मॅनहट्टन परिसरात घडली आहे. एका खोलीला आग लागली त्यानंतर ही आग पसरत गेल्याची माहिती मिळाली आहे. 


या दुर्घटनेत एकाचा जीव वाचला आहे तर दुसऱ्या व्यक्तीला आपला जीव गमवण्याची वेळ आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.