न्यूयॉर्क : शनिवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये ट्रंप टॉवरमध्ये भीषण आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्य़ाची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही आग ट्रंप टॉवरच्या ५० व्या माळ्यावर लागली होती. या दरम्यान अग्निशमन दलाचे ४ जवान देखील जखमी झाले आहेत. याच इमारतीमध्ये ट्रंप यांचं घर आणि ऑफीस देखील आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क पोलिसांनी म्हटलं की, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हा ६७ वर्षांची व्यक्ती जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पण या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून समोर आलेलं नाही. 



अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची ही बिल्डींग आहे. यामध्ये त्यांचं घर आणि ऑफीस देखील आहे. ट्रंप सध्या वॉशिंग्टनमध्ये आहेत. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक धुर येऊ लागला. ही गोष्ट कळताच आजबाजुचे मार्ग बंद करण्यात आले. आगीवर काही वेळात नियंत्रण आणलं गेलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विट करुन अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.