COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : गाणं गाताना गायिकेच्या केसांना आग लागलीये. हॉलिवूड सिंगर सोफिया एलारचे केस गाणं गातानाच जळलेत.. मेणबत्तीमुळे तिच्या केसांनी  पेट घेतला. सोफिया आपला बॉयफ्रेंड अलवारोसोबत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 


या कार्यक्रमात ती प्रेक्षकांच्या आग्रहास्तव एल रायो वर्डे हे स्पॅनिश गाणं गात होती. दरम्यान तिच्या पाठीमागे असलेल्या मेणबत्तीमुळे तिच्या केसांना आग लागली. तिच्या केसांमधून धूर येऊ लागला. हा धूर पाहून अलवाने सोफिया सावध केलं आणि आग विझवली. 


सुदैवानं या अपघातात तिला कुठलीही इजा झाली नाही. मात्र यामुळे तिला आपला कार्यक्रम थांबवावा लागला. या अपघाताचा व्हिडीओ स्वत: सोफियाने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 



काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत सोफियासाठी काळजी व्यक्त केली आहे.