Burning Railway Track: रुळावर दूरपर्यंत लागली होती आग, हायस्पीड ट्रेन आली आणि...
Oil Tanker Crash On Railway Track: जगभरात रेल्वे अपघाताचं प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित मानलं जातं. पण जेव्हा कधी रेल्वेचा अपघात होतो, तेव्हा मात्र मृत आणि जखमींचा आकडा सर्वाधिक असतो. जगभरातून रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ मॅक्सिकोमधून समोर आला आहे.
Oil Tanker Crash On Railway Track: जगभरात रेल्वे अपघाताचं प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित मानलं जातं. पण जेव्हा कधी रेल्वेचा अपघात होतो, तेव्हा मात्र मृत आणि जखमींचा आकडा सर्वाधिक असतो. जगभरातून रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ मॅक्सिकोमधून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका रेल्वे ट्रॅकला आग लागल्याचं दिसत आहे. त्या ट्रॅकवरून भरधाव वेगाने गाडी जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या ट्रॅकवर ट्रेन येण्यापूर्वी आग लागली होती. पण ट्रेनचा वेग पाहता आधीच थांबवणं कठीण होतं. तसा प्रयत्न केला असता तर रेल्वेचा मोठा अपघात घडू शकला असता. सुदैवाने या ट्रॅकवरून भरधाव वेगाने ट्रेन गेली मात्र कोणताही अपघात घडला नाही.
ट्रेन येण्यापूर्वी एक ऑईल टँकर रेल्वे रुळावरून जात होता. नेमका त्याचवेळी टँकरमधील तेलाची गळती सुरु झाली आणि संपूर्ण तेल ट्रॅकवर पसरलं. त्यानंतर पडलेल्या तेलाला आग लागली. बघता बघता रेल्वे ट्रॅक परिसरात पसरलेल्या संपूर्ण तेलाला आग लागली. पण इतक्यात समोरून एक ट्रेन येताना दिसली आणि उपस्थितांचा थरकाप उडाला. सुदैवाने ट्रेन त्या ट्रॅकवरून गेली आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही.
अरे बापरे! किचनमध्ये घुसला King Cobra, सर्पमित्रानं कसं पकडलं; पाहा Video
ही एक मालवाहतूक ट्रेन होती आणि सर्व बाजूंनी बंद होती. ट्रेन पुढे जात राहिली आणि ज्वाळा निघत राहिल्या. रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.