वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा पत्रकारांवर हल्ला करण्यात आलाय. एनापोलिस राज्याची राजधानी मेरीलँडमध्ये गुरुवारी 'कॅपिटल गॅझेट'च्या न्यूजरुमध्ये ही घटना घडली. एका बंदुकधारी व्यक्तीनं कार्यालयात अचानक प्रवेश करत अंधाधुंद फायरिंग सुरू केली. या घटनेत पाच पत्रकारांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय... तर अनेक जण जखमी झालेत. घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांनी हल्लेखोराला अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३८ वर्षीय जेरोड रॅमोस या हल्लेखोराला अटक करण्यात आलीय. 'कॅपिटल गॅझेट'वर तो काही कारणानं नाराज होता, असं सांगण्यात येतंय. २०१२ साली जेरो़नं वृत्तपत्राविरोधात मानहानिचा खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला कोर्टानं निकालात काढला होता. 


या घटनेवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दु:ख व्यक्त केलंय. हा कोणताही दहशतवादी हल्ला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. आरोपीनं आपल्या व्यक्तीगत नाराजीतून हे कृत्य केल्याचं उघड झालंय. 


उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेत बंदुकांची अनेक दुकानं आहेत. इथं कुणासाठीही बंदुक बाळगणं ही अतिशय साधी आणि सोपी गोष्ट आहे. त्यामुळेच, इथं गोळीबाराच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत.