बीजिंग : चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  (Coronavirus Pandemic) वाढला आहे. आठ महिन्यांनंतर चीनमध्ये (china) कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) पहिला मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कोरोनाव्हायरस महामारीने पुन्हा एकदा चीनमध्ये संकट ओढवले आहे. चीनमध्ये 10 महिन्यांनंतर एका दिवसातही कोविड-१९चे (covid-19) सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.


हेबेई प्रांतात एका रुग्णाचा मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ताज्या मृत्यूंविषयी फारशी माहिती दिली नाही, परंतु हेबेई प्रांतात (Hebei Province) कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. येथेही नवीन कोरोनाबाधित वाढत आहेत. यापूर्वी चीनमध्ये कोविड -१९ने शेवटचा मृत्यू गेल्या वर्षी 17 मे रोजी झाले होता.


मार्चनंतरची सर्वात जास्त रुग्ण


बुधवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 138 झाली, जी 5 मार्चनंतरची सर्वाधिक आहे. एक दिवस आधी, मंगळवारी, 115 नवीन प्रकरणे नोंदली गेली. आयोगाने अहवाल दिला आहे की 124 रुग्णांना स्थानिक संसर्ग झाल्याची घटना घडली असून त्यापैकी 81 हेबेई प्रांतात आणि 41 रुग्ण हेइलॉन्जियांग प्रांतात नोंदले गेले आहेत.


चीनमध्ये 885 सक्रिय प्रकरणे  


चीनमध्ये कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) आतापर्यंत 87844 लोकांना या साथीचा आजार झाला आहे. त्यापैकी 4635 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोविड-19चे (Covid-19) आतापर्यंत  82324  लोक बरे झाले आहेत आणि 885 सक्रिय प्रकरणे अस्तित्त्वात आहेत.