बर्लिन : जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. ब्रिटननंतर आता Omicron प्रकारामुळे जर्मनीमध्ये ही पहिल्या मृत्यूची नोंद झालीये. जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शियस डिसीजेसने गुरुवारी याची पुष्टी केली आहे. संस्थेने सांगितले की, व्यक्तीचे वय 60 ते 79 वर्षांच्या दरम्यान आहे. जर्मनीमध्ये ओमायक्रॉनच्या 810 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 3,198 वर पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन प्रकारामुळे आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्री गिलियन कीगन यांनी ही माहिती दिली आहे. गिलियन कीगन यांच्या मते, यूकेमध्ये ओमायक्रॉन प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.


ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत ब्रिटनमध्ये 18, अमेरिकेत 1 आणि इस्रायलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. एका अहवालानुसार, गेल्या एका आठवड्यात ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.