मुंबई : पोर्नोग्राफी संदर्भात राज कुंद्राला झालेली अटक आणि त्यासंदर्भातील गोष्टी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला 19 जुलैला रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणी त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या प्रतिक्रियेत सांगितले की, हॉटशॉट ऍपवर (Hotshot App) दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटला तिले वर्णन 'पॉर्न' नसून एरॉटिक असल्याचे सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर पॉर्न इंडस्ट्रि बरीच चर्चेत आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये पोर्न उद्योग कायदेशीर आहे. पॉर्नवर चर्चा होऊ शकते, वादविवाद होऊ शकतो, बंदी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ... परंतु तरीही याला बंद केले जाऊ शकत नाही.


जगभरात एक मोठा वर्ग आहे, जो या पॉर्न उद्योगाशी निगडित आहे आणि ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. दुसरीकडे, पॉर्नचे प्रेक्षक यापेक्षा खूप मोठे आहेत. 6 वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण आले, त्यानुसार, पोर्न सर्च करणाऱ्यात भारतीयांची संख्याही खूप जास्त होती.


जगातील अनेक देशांमध्ये पोर्न इंडस्ट्री आहे, पण त्याच्या प्रशिक्षणासाठी पोर्न युनिव्हर्सिटीही असू शकते याची तुम्ही कल्पना करू शकता का? परंतु हे खरं आहे.


जगातील पहिले पॉर्न विद्यापीठ!


विद्यापीठ म्हणजे शिक्षणाचे केंद्र. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापासून ते कॅमेरा आणि दिग्दर्शनापर्यंत सर्व संस्था बांधल्या गेल्या आहेत. विशेषतः अभिनयासाठी अनेक संस्था आहेत. भारतात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या संस्था देखील आहेत. पण पॉर्न चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी देखील स्वतंत्र प्रशिक्षण आवश्यक असतं का?


गरज  तर सोडाच परंतु यासाठी एक विद्यापीठ आहे हे तरी तुम्हाला पटतयं का? तुम्हाल पटत नसले तरी असे विद्यापीठ जगात आहे आणि ते हंगरीमध्ये आहे. जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने तरुणांना प्रवेश मिळवायचा असतो आणि साहजिकच त्या हजारो तरुणांना या उद्योगाचा भाग व्हायचे आहे. अर्जदारांमध्ये मुले आणि मुली दोघांचा समावेश आहे.


पॉर्न चित्रपटांमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण!


रोको सिफरेदी (Rocco Siffredi) बऱ्याच लोकांनी हे नाव पहिल्यांदा वाचले असेल, पण तो पॉर्न चित्रपटांचा मुख्य स्टार राहिला आहे. रोको सिफरेदी एक इटालियन पोर्न स्टार आहे, ज्याने 1300 हून अधिक पॉर्न चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजपासून 6 वर्षांपूर्वी 2015 मध्ये त्यांनी एक घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.


त्याने जाहीर केले की, तो सिफ्रेडी हार्ड अकादमी (Siffredi Hard Academy) नावाचा एक रिअॅलिटी शो घेऊन येत आहे, ज्याची संकल्पना पोर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक अभिनेते आणि अभिनेत्रींना प्रशिक्षण देणे आहे.


या प्रशिक्षणात सेक्शुअल पोजिशनिंग (Sexual Positioning), चेहऱ्यावरील भाव, सेक्शुअल इंटरकोर्ससाठी (Sexual Intercourse) अभिनेते-अभिनेत्री यांच्यातील आवश्यक केमिस्ट्री आणि डायलॉग डील्हिवरीबद्दल ट्रेन केलं जातं. त्यावेळेस लोकांना याबद्दस इतकं क्रेझ होतं की, त्यावेळेस हजारो तरुणांनी या प्रशिक्षणासाठी अर्ज केले, त्यातुन फक्त 14 मुले आणि 7 मुलींची निवड केली गेली.


कॅमेऱ्यासमोर कसे परफॉर्म करायचे? याचा क्लास...


independent.co.uk च्या अहवालानुसार, या विद्यापीठात, तरुणांना अडल्ट सीनसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. कॅमेऱ्याला कसे फेस करावे हे त्यांना सांगितले जाते.


कॅमेरासमोर सेक्स कसा करावा याबद्दल संपूर्ण क्लास घेतला जातो. ज्यांना अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांना सिफरेदी स्वतः प्रशिक्षण देतात.


मीडिया रिपोर्टनुसार, सिफरेदी दावा आहे की, त्यांच्या संस्थेत लैंगिक संबंधांच्या कृत्रिम पद्धती शिकवल्या जात नाहीत. तसचे प्रशिक्षित लोकं देखील कॅमेरावर पूर्णपणे वास्तविक आणि खरे दिसू इच्छितात.


हे हंगेरीच्या Csömör, Rét street मध्ये रोको सिफरेतीची ही यूनिवर्सिटी आहे. एक वेळ अशी होती की, या यूनिवर्सिटीचा विरोध करण्यात आला होता परंतु पॉर्न सगळ्या देशात वैद्य असल्याने नंतर याला सुरू ठेवण्यात आले.