Gym Influencer Death : जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा (Fitness Influencer) दुर्देवी मृत्यू झाला. 210 किलोचा बारबेल त्याच्या मानेवर पडला आणि यात त्याची मान मोडली. या घटनेत त्याचा जागेवरच मृत्यू झाला. जस्टिन विक्की असं मृत तरुणाचं नाव आहे. जिममधल्या (Gym) इतर लोकांनी जस्टिनला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातल्या (Indonesia) बालीमध्ये ही दुर्देवी घटना घडली. जस्टिन विक्की अवघ्या 33 वर्षांचा होता. त्याला फिटनेसची प्रचंड आवड होती. तो नियमित व्यायामही करायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना 15 जुलैला घडली. घटनेच्या दिवशी जस्टीन विक्की (Justin Vikki) नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करत होता. यावेळी त्याने 210 किलोचं वजन (Barbell) उचलण्याचा प्रयत्न केला. बारबेल त्याने खांद्यावर घेतला पण इतकं वजन त्याला पेलवता आलं नाही. तो खाली कोसळला आणि बारबेल त्याच्या मानेवर पडला. प्रचंड वजनामुळे त्याच्या मानेच्या नसा दबल्या गेल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जस्टीन विक्कीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


जस्टिन विक्की बालीतल्या पॅराडाइज जिममध्ये व्यायाम करायचा. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत (Viral Video) जस्टीन 210 किलोचं वजन उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पण त्याचं संतुलन बिघडलं आणि तो खाली कोसळला. या गडबडीत त्याला मदत करणारा व्यक्तीही खाली पडला. पण 210 किलोचं वजन जस्टीनच्या मानेवर पडलं. जस्टीनाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.


आशिष साखरकरचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच भारताचा प्रसिद्ध बॉडिबिल्डर आशिष साखरकरचा मृत्यू झाला होता. आशिष साखरकर हे बॉडीबिल्डिंग विश्वातील अत्यंत मोठं नाव होतं.  महाराष्ट्र श्रीपासून मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स अशा अनेक स्पर्धेंवर आशिषने नाव कोरलं होतं. गेले काही दिवस तो आजाराशी झुंज देत होता. पण त्याची ही झुंज अपयशी ठरली. मुंबईकर आशिषच्या अचानक जाण्याने क्रिडा विश्वास शोककळा पसरली आहे. आशिषने मिस्टर इंडियाचं तब्बल चार वेळा जेतेपद पटकावलं होतं. तर फेडरेशन कपही त्याने चार वेळा जिंकला होता. मानाच्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्याने भारतााल रौप्य आणि कांस्य पदक पटकावून दिलं होतं. तर मिस्टर आशिया स्पर्धेतही त्याने रौप्य पदक जिंकलं होतं.