मुंबई : सप्राईज कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपल्या आयुष्यात असं काहीतरी व्हावं, ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसावा. असाच एक प्रकार एका फूड डिलिव्हरी बॉयसोबत घडला आहे. त्याला फुड डिलिव्हरी करताना आयुष्यात असं काही सप्राइज मिळलं, ज्याचा त्याने कधी विचार देखील केला नसावा. ज्यानंतर तो खूप आनंदी झाला. हे डिलिव्हरी बॉय नेहमी लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम करतात. परंतु ग्राहकांने त्यांना अन्न देण्याची घटना बहुतेक पहिल्यांदाच घडली असावी. हे प्रकरण नक्की कुठले आहे, हे कळलेलं नाही. कारण ही घटना फेसबुकवरती शेअर करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार एका फेसबुक पेजवर मांडण्यात आला. ज्यामध्ये एका युजरने त्याच्या पेजवर एक स्क्रन शॉर्ट टाकून संपूर्ण घटना सांगितली. ज्यामुळे आता ही पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे.


फेसबुकवर शेअर केलेल्या या स्क्रिनशॉर्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, फूड डिलिव्हरी बॉय फूड घेऊन पोहोचला आहे, असे त्याने मेसेज केले असता, फूड ऑर्डर केलेल्या व्यक्तीने त्याला सांगितले की, ते फूड तुच ठेव, कारण मी माझा पत्ता बदलायला विसरलो होतो. तेव्हा या डॉलिव्हरी बॉयने देखील त्याला धन्यवाद म्हणत एक मेसेज लिहिला, ज्यामुळे त्याला किती आनंद झाला असावा हे त्याच्या मेसेजवरुन तुम्हाला कळेलच.


खरेतर एका ग्राहकाने काही फूड ऑर्डर केले होते आणि नंतर त्याच्या  लक्षात आले की त्याने त्यावर पत्ता बदललेला नाही. म्हणजे या फुड ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने आपली राहण्याची जागा बदलली होती, परंतु तो फूड आर्डर करताना त्याने त्याचा डिलिव्हरी पत्ता पूर्वीचाच ठेवला होता. म्हणून मग फूड डिलिव्हरी बॉय ज्या ठिकाणी होता, तेथे हा व्यक्ती फूड घेण्यासाठी येऊ शकत नव्हता, ज्यामुळे मग त्याने ऑर्डर केलेले फुड मग त्याने त्या डिलिव्हरी बॉयलाच खाण्यासाठी सांगितले, ज्यामुळे या डिलिव्हरी बॉयला देखील खूप आनंद झाला.


फूड डिलिव्हरी बॉयने मेसेजमध्ये लिहिले, 'मला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणायचे आहे. आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे आणि तुझ्यामुळे मी आता माझ्या भावासोबत जेवत आहे. हे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुला माहीत नाही. मी मनापासून आभारी आहे.'