Ex Pak PM Imran Khan Arrested: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने कोर्टरुमच्या बाहेरच इम्रान खान यांना अटक केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान हे इस्लामाबाद कोर्टामध्ये उपस्थित होते. ते कोर्टातून बाहेर आल्यानंतर त्यांना कोर्टाबाहेरच अटक करण्यात आल्याने परिसरामध्ये तणाव वाढला. या ठिकाणी इम्रान यांच्या समर्थकांनी हाणामरही केली. काही वकिलांना इम्रान यांच्या समर्थकांनी मारहाण केली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान यांनी कोर्टात जाण्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं म्हणणं सविस्तरपणे मांडलं आहे. "आज मला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आयएसपीआरने मी लष्कराची आणि गुप्तचर यंत्रणांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. ज्या अधिकाऱ्याने दोनदा माझ्या हत्येचा प्रयत्न केला त्याचं नावं घेतल्याने माझ्यावर टीका झाली. देशात प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. सध्या मी विरोधी पक्षाचा नेता आहे. मला कोणत्याही प्रकारे खोटं बोलण्याची गरज नाही. आज 50 वर्षांहून अधिक काळापासून मला देशातील जनता मला ओळखते. जेव्हा या प्रकरणाचा तपास होईल तेव्हा मी हे सिद्ध करुन दाखवेल की या व्यक्तीनेच माझ्या हत्येचा कट रचला होता. या व्यक्तीबरोबर संपूर्ण टोळी कार्यरत आहे," असंही इम्रान खान या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. इम्रान यांना अटक करण्यात आल्याचा व्हिडीओही पीटीआय या पक्षाने पोस्ट केला आहे.



"या व्यक्तीच्या मागे कोण आहे हे सर्वांना ठाऊक आहे. माझा प्रश्न असा आहे की देशाचा एका माजी पंतप्रधानाने केवळ या व्यक्तीचं नाव घेतल्याने त्याला एफआयआरही दाखल करु दिली नाही. खरं तर तेव्हा समोर येईल जेव्हा तपास होईल, एफआयआर दाखल झाली होती, माहिती गोळा केली जाईल. निर्दोष असेल तर यामधून तो सहज बाहेर आला असता.  मला एफआयआरमध्ये त्याचं नाव घेऊ दिलं नाही," असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. 


 



इम्रान यांना अटक झाल्यानंतर झालेल्या झटापटीमध्ये इम्रान यांचे वकीलही जखमी झाल्याचं इम्रान यांच्या पक्षाने व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे. 



मला मारण्याचा कट झाला त्यामध्ये आयएसआयचाही सहभाग होता असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. अनेक गोष्टींमध्ये गरज नसताना आयएसआयने हस्तक्षेप केल्याचा आरोपही इम्रान यांनी अटकपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.