नवी दिल्ली : फ्रान्सचे नवनिर्वाचीत राष्ट्रपती एमानुएल मॅक्रॉन आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या तीन महिन्यांतच टीकेचे धनी बनले आहेत. मॅक्रॉन यांनी अवघ्या तीन महिन्यात २० लाख रूपये उडवले आहेत. तेही दुसऱ्या तिसऱ्या कारणासाठी नव्हे तर, केवळ मेकअपसाठी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती पदाची सूत्रे हातात घेऊन मॅक्रॉन यांना केवळ तीनच महिने झाले आहेत. हा कालावधी दिवसांत मोजायचा तर साधारण ९० दिवस होतात. या काळात या महोदयांनी चक्क २६,००० युरो (भारतीय रूपयांत २० लाख) उडवले आहेत. याबाबत केलेल्या खुलाशात मॅक्रॉन यांच्या कार्यालयानेही ही बाब मान्य केली आहे. नागरिकांना मात्र राष्ट्रपतींची ही हौस आवडली नाही. त्यामुळे त्यांनी थेट टीका करण्यास सुरूवात केली आहे.


एका फ्रेंच मासिकाने याबाबत दावा केला आहे. या दाव्यानुसार, राष्ट्रपती एमानुएल मॅक्रॉन ३९ वर्षीय आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळातील सुरूवातीच्या १०० दिवसांत २०,००० यूरो म्हणजेच ३० हजार डॉलर इतकी रक्कम केवळ मेकअपवर खर्च केली आहे. मॅक्रॉन महोदय हे महन्याकाठी १० हजार डॉलर तर, प्रतिदिन ३३० रूपये आपल्या मेकअपवर खर्च करतात. हे सगळे पैसे टॅक्सपेअर्स होते. एमानुल यांच्या खासगी मेकअप आर्टिस्टला दोन वेळा दिलेल्या बिलातील रक्कम १० हजार आणि १६ हजार यूरो इतकी आहे.