पॅरीस :  दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोणताही मनुष्य चुकांमधून शिकत असतो. हे लक्षात घेऊ फ्रान्सच्या संसदेने एक असा कायदा पारीत केला आहेत, ज्यात नागरिकांना सरकारी कामकाजात चूक करण्याचा अधिकार दिला आहे. 


'राइट टू मिस्टेक्स' असे या कायद्याचे नाव 


'राइट टू मिस्टेक्स' असे या कायद्याचे नाव आहे. यानुसार चूक झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा दंड लागणार नाही आहे. ही माफी केवळ एका चुकीसाठी मिळणार आहे. तसेच अशी चूक करण्यामागे कोणताही चुकीचा हेतू नसेल तर ही माफी मिळणार आहे. चूक जाणून बुजून केली आहे, हे सिद्ध करणे अधिकाऱ्यांचे काम असणार आहे. 


राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रचारातील मुद्दा


हा कायदा सरकारने एका विश्वनीय समाजाचा पाया म्हणून पाहिले आहे. हा कायदा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोनच्या सुधारणा अजेंड्याचा भाग आहे. त्यांनी राष्ट्रपती निवडणूक प्रचार अभियात हा मुद्दा उपस्थित केला होता. प्रशासकीय कामात चांगल्या हेतूने चूक करण्याचा अधिकार असला पाहिजे असा मुद्दा चर्चिला गेला होता. त्यानुसार हा कायदा पास करण्यात आला आहे. 


कायदा संमत झाल्यानंतर फ्रान्स पब्लिक अॅक्शन अँड अकाउंट्स मंत्री जेराल्ड डरमनाने ट्विट करून या निर्णयाला नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी क्रांतिकारक म्हटले आहे. 


क्रांतिकारक निर्णय 


ते म्हणाले, चूक करणे मानवाचा स्वभाव आहे. सरकारकडून या चूकीला माफीही फक्त पहिल्या चुकीला आहे. दरम्यान या कायद्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी काही कलमात बदल करणे गरजे आहे. आरोग्य, पर्यावरण, संरक्षण यात काही प्रकरणात चूक करण्याचा अधिकार लागू होणार नाही.