पॅरीस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन (Emmanuel macron) यांच्या एका कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या लोकांना भेटत असताना या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएफएमटीवी आणि आरएमसी रेडियोच्या माहितीनुसार या प्रकरणात 2 लोकांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.



यापूर्वी देखील अनेकदा अशाच प्रकारे अनेक नेत्यांवर हल्ले झाले आहेत. मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा असताना देखील अशा घटना घडतात.