Nostradamus predictions 2023 : नरेंद्र मोदी सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधान झालेत आणि तेही बहुमतानं. नरेंद्र मोदी पंतप्रधान(PM Narendra Modi) होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं.  फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमसनं(French prophet Nostradamus) मोदींच्या पंतप्रधानपदाची भविष्यवाणी आधीच वर्तवली होती. नॉस्ट्रॅडॅमसनं अनेक भविष्यवाण्या वर्तवल्या त्यापैकी अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि सलग दोन वेळा बहुमतानं देशाचे पंतप्रधान होण्याचा विक्रम रचला आहे.  मोदींनी सत्तेवर राहण्याचा जो विक्रम केलाय तो देशात यापूर्वी कुणीही कधीच केलाच नाही. पण, मोदी पंतप्रधान होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं. फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडॅमसनं 15 व्या शतकात मोदींच्या पंतप्रधानपदाची भविष्यवाणी वर्तवली होती असं सांगितलं जाते. 


नॉस्ट्रेडॅमसनं मोदींबाबत काय लिहिलं होतं?


नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील. मोदी 20 वर्षं केंद्रात सत्तेत राहतील. मोदी भारताला एका उंचीवर नेतील. मोदी हे जागतिक नेते असतील. फ्रेंच नॉस्ट्रेडॅमसने जगभरात केव्हा काय होईल याचं भविष्य लिहून ठेवलंय. 15 व्या शतकात त्यानं लॅटीन भाषेत द प्रोफेसीज या पुस्तकात ही भविष्यवाणी वर्तवली. 


विशेष म्हणजे नॉस्ट्रेडॅमसने त्याच्या 'द प्रोफेसीज' या पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती, आण्विक हल्ले, अॅडॉल्फ हिटलर आणि 9/11 च्या हल्ल्याची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली. आता पंतप्रधान मोदींबद्दलही नॉस्ट्रेडॅमसनं जे लिहिलंय ते सत्यात उतरल्यानं आता भविष्याबाबतही उत्सुकता वाढली आहे. 


70 टक्के भाकिते दरवर्षी खरी ठरतात


फ्रेंच संदेष्टा मायकेल डी नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी(Nostradamus Predictions 2022) वर्षानुवर्षे खरी ठरत आहे. नॉस्ट्रॅडॅमसच्या  ‘लेस प्रोफेटिस’  या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1555 मध्ये आली. नॉस्ट्रॅडॅमसच्या या पुस्तकात एकूण 6338 भविष्यवाण्या लिहील्या आहेत. ज्यापैकी बहुतेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.


2022 अणुबॉम्बचा स्फोट होईल शी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली होती. त्यानुसार 2022 मध्ये युक्रेनही रशियाचे युद्ध पहायला मिळाले. तर 2021 मध्ये त्याने महामारी, दुष्काळ आणि विध्वंस यांसारखे भाकीत केले होते ज्याचा संबंध कोरोना विषाणू आणि त्यामुळे जगभरातील विनाशाशी जोडला गेला.