मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये उदयास आलेला हा विषाणू आता संपूर्ण जगासाठी शाप ठरला आहे. अमेरिकेत तर या व्हायरसने  अत्यंत धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत कोरोनामुळे १२०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात देखील या विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. भरतात ही संख्या आता ४२१३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात  कोरोनाचे ४७२ नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनुसार गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत १२०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा सध्याच्या घडीचा सर्वात मोठा असल्याचं सांगितलं जात आहे. 


- कोरोना व्हायरसा सर्वाधिक फटका अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला बसला आहे. या ठिकाणी एका दिवसांत कोरोनाचे ४१०५ रुग्ण समोर आले आहेत. तर २१८ जणांचा बळी गेला आहे. या शहरामध्ये आतापर्यंत तब्बल ६४, ९५५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय २४७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. 


- भारतात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या संख्येने होत आहे.  भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ५७७ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४७२ नवीन रुग्ण आढळले आहे.


- तर भारतात कोरोना व्हायरसने तब्बल ८३ जणांचा बळी घेतला आहे.