वॉशिंग्टन : सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये सुरु असणारा हिंसाचार साऱ्या जगाचं लक्ष वेधत आहे. वर्णभेदाची बाब पुन्हा एकदा अधो्रेखित करत अमेरिकेची एक वेगळी बाजू जगासमोर मांडली जात असताना आणि याचा आपल्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होत असल्याचं पाहून राष्ट्राध्यक्ष donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी ज़ॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूप्रकरणी अखेर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉर्जला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यांवर उतरत थेट अमेरिकेच्या पोलीस यंत्रणेलाच आव्हान देणाऱ्या असंख्य नागरिकांचा उद्रेक पाहून, आपलं सरकार हे जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


'सध्या अमेरिकेतील नागरिकांचं मन जॉर्ज फ्लॉईडच्या निर्घृण मृत्यूनं हेलावलं आहे. माझं सरकार हे जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असेल', असं ट्रम्प माध्यमांना संबोधित करत म्हणाले. 
एक राष्ट्राध्यक्ष म्हणून आपली भूमिका अधोरेखित करत त्यांनी अमेरिकेतील नागरिक आणि या देशाचं रक्षण करणं हेच आपलं पहिलं कर्तव्य असल्याचं म्हटलं. देशातील न्यायव्यवस्था अबाधित ठेवण्याची शपथ घेणाऱ्या ट्रम्प यांनी आपण ती अबाधित ठेवू असा विश्वासही व्यक्त केला.


दरम्यान, रोझ गार्डन येथे ट्रम्प यांच्या या संबोधनपर भाषणापूर्वी पोलीस यंत्रणांकडून त्या ठिकाणी आंदोलनं करण्यासाठी जमलेला जमाव पांगवण्यात आला होता. आपण शांततापूर्ण आंदोलनांचे प्रणेते असल्याचं म्हणत ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून देशात सुरु असणाऱ्या हिंसात्मक कृत्यांवर कटाक्ष टाकला. सोबतच या सर्व घटनांमध्ये शांतातपूर्ण आंदोलनं करणाऱ्या वर्गाला हिंसक प्रवृत्तीच्या वर्गामुळं फटका बसत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.


एकिकडे फ्लॉईडला न्याय मिळेलच असा सूर आळवणाऱ्या ट्रम्प यांनीच काही दिवसांपूर्वी देशात सुरु असणारी ही हिंसक आंदोलनं आणि नागरिकांनी कायदा हातात घेण्याची कृत्य खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला होता. व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव Kayleigh McEnany यांनी याबाबतची माहिती दिली होती. 


वर्णद्वेषावरून अमेरिकेत भडका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लपण्याची वेळ


 


वर्णभेदाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत उसळलेल्या या हिंसेमध्ये आतापर्यंत ४ हजार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असं असतानाही आता पोलीस यंत्रणांनाच आव्हान देत या आंदोलनांना आणखी हिंसक वळण मिळताना दिसत आहे.