Interesting Fact : तुम्हाला प्रवास (Travel) करायला आवडतो का? चला असं गृहित धरुया, की तुम्हाला प्रवासाची आवड आहे. याच आवडीखातर तुम्ही काय बरं करु शकता? याचंही उत्तर तुम्हाला सुचत नसेल तरी  काहीच हरकत नाही. पण, प्रवासाची आवड असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहित असायलाच हवी. ही गोष्ट आहे, जगातल्या सर्वात (Longest Road) लांबलचक रस्त्याची. देश ओलंडून जाणाऱ्या या रस्त्यातून प्रवास करताना तुम्हाला बरेच बदलही पाहता येऊ शकतात. बरं हे अंतर इतरं मोठं आहे की Google Maps सुद्धा तुम्हाला त्याबाबत काही सर्च केलं असता, तुम्ही भानावर आहात ना? अशीच काहीशी प्रतिक्रिया देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कितीही असलं तरीही ही एक अतिशय रंजक बाब आहे. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केप टाऊन ते रशियातील (Russia) मगदान यादरम्यानचं अंतर हा जगातील सर्वात लांब रस्ता म्हणून ओळखलं जातं. 


सोशल मीडियावर (Social Media) उपबल्ध असणाऱ्या माहितीनुसार हा जगातील पायी जाता येण्याजोगा सर्वात लांब रस्ता आहे. या दाव्यानुसार या वाटेवरून जाण्यासाठी विमान, फेरी किंवा इतर कोणत्याही साधनाची गरज नाही. या वाटेत फक्त रस्ते आणि पूल आहेत. 


कोणकोणत्या भागांतून जाते ही वाट? 


ही वाट दक्षिण आफ्रिकेतून निधून सुएझ (suez) कालव्याहून पुढे जाते. वाटेत तुर्की आणि मध्य आशिया ओलांडून सायबेरीया पार करत मग मगदानमध्ये पोहोचतो. 


हे अंतर किती किलोमीटरचं आहे माहितीये? 


Brilliantmaps नुसार हे अंतर 22387 किलोमीटर इतकं आहे ps जे ओलांडण्यासाठी 4492 तासांचा वेळ लागू शकतो. Google Maps चा आधार घेतल्यास हेच अंतर 21550 किमी असल्याचं दाखवण्यात येतं जे ओलांडण्यासाठी अंदाजे 4263 तास इतका वेळ लागतो. अंदाजे हे तासांचं गणित दिवसांत सांगावं तर, 180 ते 190 दिवसांच्या कालावधीत हे अंतर पायी ओलांडता येऊ शकतं. 



17 देश ओलांडण्याची संधी देतोय हा रस्ता ... 


या रस्त्यातून जात असताना तुम्ही 17  देश ओलांडू शकता. तर सहा विविध Time Zone तुम्ही सहजपणे पार करता. हा रस्ता ओलांडताना तुम्ही हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा तसंच वातावरणातील काही अल्हाददायक बदलही अनुभवू शकता. 


अहं.... खरा ट्विस्ट पुढे आहे. कारण, मानवी स्वभावानुसार दिवस- रात्रीचं चक्र पाहता दर दिवशी किमान 8 तासांचं चालणं झालं तर हा प्रवास तब्बल 562 दिवसांवर पोहोचू शकतो. 


या प्रवासात आणखी खास काय ?


कल्पनांच्या विश्वात जर तुम्ही पोहोचला असाल, तर या प्रवासात काय खास आणि पाहण्याजोग्या गोष्टी आहेत त्याबाबतही एकदा जाणूनच घ्या. 


वाचा : Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा 


ही लांबलचक वाट सर करण्यासाठी निघत असाल तर, तुम्ही तुमच्या प्रवासाची सुरुवात केप टाऊनच्या Table Mountain National Park पासून करु शकता. इथली 2-3 तासांची सफर तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देईल. बोस्टवानामध्ये असताना तुम्ही Chobe National Park आणि Okavango Delta या दोन राष्ट्रीय उद्यानांमध्ये अवाढव्य हत्ती, सिंह, जिराफ, झेब्रा असे वन्य प्राणी पाहण्याची संधी मिळेल. 



पुढचा टप्पा अगदी रंजक... 


झाम्बिया आणि झिम्बाब्वेच्या सीमाभागात असणाऱ्या झाम्बेझी नदीपाशी असणारा Victoria Fall तुम्ही नक्कीच पाहू शकता. इथवर तुमच्या प्रवासातले साधारण 20 ते 25 दिवस सरले असतील. वाट मागे सरत राहिल्यानंतर 14000 मैलांचा प्रवास पूर्ण होताच तुम्ही इजिप्तच्या संस्कृतीला जवळून पाहू शकता. इथं असणारे अद्वितीय भौमितीक रचनांचे पिरॅमिड्स तुम्हाला अवाक् केल्यावाचून राहणार नाहीत. 



पुढे जॉर्डनमधून जाताना तुम्ही  Al-Khazneh (The Treasury) Temple या पेत्रातील स्थळाला भेट देऊ शकता. वाट काहीशी आणखी सुखकर करायची असल्यास तुर्कीच्या  Lake Van परिसरातून नक्की जा.  Armenian Kingdoms पासून तुमचा प्रवास पुढे सुरु ठेवा. 



आता अखेरचा टप्पा..... 


रशियामध्ये पोहोचण्यापूर्वी तुमचा अखेरचा टप्पा असणार आहे जॉर्जिया. इथल्या Tbilisi शहराला नक्की भेट द्या. जुनी आणि लाल रंगाची छतं असणारी घरं पाहून आपण वेगळ्याच दुनियेत आल्याची अनुभूती तुम्हाला होईल. या शहराच्या स्थापत्यशास्त्रानं भारावून होताच आता प्रवास शेवटच्या रोखानं सुरु करायचा आहे.... पावलं झपाझप टाकता टाकता अखेर तुम्ही रशियात (Russia) पोहोचता. इथं तापमान काहीसं गारठवणारं आहे. आता हा देश धुंडाळण्यासाठी आणि पुढच्या अशाच एका प्रवासासाठी तुम्ही तयार असाल.