Viral Video : ऑफरोड जीपसोबत अजब-गजब प्रयोग, लोकांनी भरलेली गाडी चिखलात आणली पण...
हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. यामध्ये भरपूर असे लोक जीपवर चढले आहे. ही जीप म्हणजे एक मॉन्स्टर ऑफरोड गाडी आहे.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक अतिशय मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर अनेक प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात तर काही तुम्हाला भावूक करतात. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला तोडचं नाही. या व्हिडीओच्या माध्यमातून एका सिनेमाचा सीन रिक्रिएट केलं गेलं आहे. तुम्हाला या व्हिडीओचा बॅग्राउंड साउंड ऐकूनच तुम्हाला लक्षात येईल की, हा कोणत्या सिनेमातील सीन आहे.
हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. यामध्ये भरपूर असे लोक जीपवर चढले आहे. ही जीप म्हणजे एक मॉन्स्टर ऑफरोड गाडी आहे. ज्याच्या टापावर जाळीसारख्या भागात लोक उभे आहेत.
त्याच वेळेला ही जीप चिखलाच्या पाण्यात हळू हळू उतरते. तो खड्डा पुढे पुढे जाऊन खूपच डीप होतो. ज्यामुळे ही जीप आणखी त्या पाण्यात बुडू लागते. परंतु त्यानंतर अचानक एक चढण येते, ज्यामुळे ही जीप त्यावर चढते. परंतु यामुळे विचित्र परिस्थीती निर्मण होते, ज्यामुळे ही जीप पुढच्या बाजूने वर होते आणि मागच्या बाजूने खाली.
या जीपमुळे सेम टायटॅनिक बुडण्याच्या वेळेला जशी परिस्थीती झाली होती, ती कॉपी केली आहे. ज्यामुळे मागे उभे असलेले बहुतांश लोक हे त्या चिखलाच्या पाण्यात पडतात.
हे दुश्य खूपच मनोरंजक आहे. Momento Titanic do. व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीय.
इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाइक केला आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये टाळ्या पाठवल्या, तर काही लोक हसणारे इमोजी पोस्ट करतानाही दिसले.