Funny video :  आजकाल अनेक सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित व्यक्ती शेती (Farming) हा व्यवसाय म्हणून स्वीकारू लागले आहेत. तर काहीजण नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतात. पण असे काहीजण असतात त्यांना शेती करण्याची फक्त आवड असते. प्रत्यक्षात मात्र शेती मधला 'श' शब्दाची पण कल्पना नसते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शेतात काम करण्याची सवय नसल्याने त्याची कशी फजिती होते, हे या व्हिडिओत पाहायला मिळायलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोरीने बांधण्याचा प्रयत्न 


या व्हिडीओमध्ये एक माणूस शेतात वावरताना दिसत आहे. त्यावेळी शेतातील सर्व पीक आडवे झाले त्या व्यक्तीला दिसत आहे. आडवे पीक पाहून तो व्यक्ती विचार करतो...की याला सरळ कसे करता येईल. मग त्याला जवळच एक दोरी दिसते. त्या पीकाच्या वरच झाडाची फांदी असते. तो झाडाच्या फांदीला खाली खेचतो आणि या आडव्या झालेल्या पीकाच्या रोपाला बांधण्याचा प्रयत्न करतो, पण घडते भलतेच काहीतरी… 


पाहा हा व्हिडिओ…