PM Modi- Rishi Sunak First Meet : इंडोनेशियामध्ये आज G20 परिषदेची सुरुवात झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देखील या परिषदेसाठी उपस्थित आहेत. आज पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्यात पहिली भेट झाली. पंतप्रधान कार्यालयानेही दोघांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे. शिवाय ते भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई देखील आहेत. (Pm Narendra Modi and Rishi Sunak first meet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची ही भेट घेतली. अजून कोणत्या ही 2 देशांमध्ये एकत्र बैठक सुरु झालेली नाही. सध्या फक्त अनौपचारिक भेटी होत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा पुरवठ्यावरील निर्बंधांबाबत विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. यावर कुठलेही निर्बंध नसावे असं ही त्यांनी म्हटलंय. हवामान बदल, कोविड-19 महामारी आणि युक्रेनच्या संकटामुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांनी जग उध्वस्त केले आहे. असं ही मोदींनी म्हटलंय.


G20 परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित होते.