Galileo Galilei On Origin of the Universe : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले. अनेक रहस्यांचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यातच आता ज्याने सर्वप्रथम ब्रह्मांडाची काही रहस्य उलगडली त्याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रह्मांडाची रहस्यं उलगडणा इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होतीय तसेच त्यांची बोटंही छाटण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यमालेचा केंद्रबिंदू पृथ्वी नाही यावरुन अद्यापही वाद विवाद सुरु आहेत. हे सिद्ध करण्यासाठी अनेक अंतराळ मोहिमा देखील राबलण्यात आल्या. मात्र, इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ याने 400 वर्षांपूर्वी पृथ्वी हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू नाही असा दावा केला होता. ब्रम्हांड आणि ब्रम्हांडाच्या निर्मीतीबाबत गॅलिलिओने अनेक सिद्धांत माडले. मात्र, गॅलिलिओला मूर्ख ठरवण्यात आले. मात्र, गॅलिलिओने माघार घेतली नाही. तो सतत आपले वैज्ञानिक सिद्धांत मांडत राहिला. शक्तिशाली कॅथोलिक चर्चचा द्वेषही त्याने ओढावून घेतला. 


कोण आहे गॅलिलिओ?


गॅलिलिओ हा इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता. 15 फेब्रुवारी 1564 रोजी पिसा येथे गॅलिलिओचा जन्म झाला. गॅलिलिओने डॉक्चर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, गॅलिलिओला गणिताची आवड होती. त्याचे मन आकड्यांमध्येच रमायचे. 


गॅलिलिओने लावला दुर्बिणीचा शोध


अवकाशा निरीक्षणाची आवड आणि खगोलशास्त्रात रुची असणाऱ्या गॅलिलिओ याने दुर्बिणीचा शोध लावला. यामुळे खऱ्या अर्थाने ब्रम्हांडाचे रहस्य उलगडण्यास मदत झाली. दुर्बिणीच्या साहाय्याने सर्व प्रथम खगोलशास्त्रीय संशोधन करणारा गॅलिलिओ जगातील पहिला व्यक्ती आहे. 


चंद्रासह अनेक ग्रहांचे निरीक्षण


दुर्बिणीच्या सहाय्याने गॅलिलिओने चंद्रासह अनेक ग्रहांचे निरीक्षण केले. चंद्र गुळगुळीत नाही. पृथ्वीप्रमाणे चंद्रावर देखील खड्डे आहेत. असे निरिक्षण  गॅलिलिओने  नोंदवले. यानंतर  गॅलिलिओने नव्या दुर्बिणीची निर्मीती केली. या दुर्बिणीच्या सहाय्याने  गॅलिलिओने गुरू ग्रहाभोवती फिरणारे चार चंद्र शोधले, शनीचा अभ्यास केला, शुक्राच्या टप्प्यांचे निरीक्षण केले आणि सूर्यावरील सनस्पॉट्सचा देखील अभ्यास केला. गॅलिलिओच्या निरीक्षणामुळेच पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात या कोपर्निकसच्या सिद्धांताला अधिक बळकटी मिळाली. पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात  असा सिद्धांत  गॅलिलिओने  मांडला. मात्र, त्याच्या सिद्धांताला कडाडून विरोध झाला. कारण,  गॅलिलिओचा हा सिद्धात विचारसरणीच्या पूर्णपणे विरुद्ध ठरवण्यात आला.  पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे आणि सूर्य आणि ग्रह तिच्याभोवती फिरतात असा दावा  गॅलिलिओच्या काळात केला जात होता. त्यावेळी चर्च आणि धर्मग्रंथानुसार सूर्य पृथ्वीभोवती फिरतो याच संकल्पनेवर सर्वाचा ठाम विश्वास होता. यामुळे गॅलिलिओला मूर्ख ठरवण्यात आले. इन्क्विझिशनने अर्थात कॅथोलिक चर्चची कायदेशीर संस्थेने त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली. गॅलिलिओ याला इन्क्विझिशनने धर्मद्रोही ठरवत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच अशा प्रकारची वक्तव्ये करुन नये अशी सूचना देखील करण्यात आली. मात्र, गॅलिलिओ आपल्या मतावर ठाम होतो. त्याने एक पुस्तक देखील प्रकाशित केले.


गॅलिलिओची बोटे का छाटली?


फ्लोरेन्समधील सांता क्रोस चर्चच्या छुप्या चॅपलमध्ये कोणत्याही अधिकृत विधीशिवाय दफन करण्यात आले. गॅलिलिओला विधर्मी मानले जात होते. यामुळेच त्याला अशा प्रकारे छुप्या पद्धतीने दफन करण्यात आले. 100 वर्षांनंतर, 1737 मध्ये, सांता क्रोसच्या चर्चमध्ये गॅलिलिओची समाधी बांधण्यात आली. यावेळी त्याच्या अवशेषांचे हस्तांतरण करताना त्याच्या हाताची बोटे छाटण्यात आली. कॅथलिक संतांच्या शरीरातून अवयव काढले जातात. यांच्यात पवित्र शक्ती असते असा समज आहे.