Ganeshotsav 2024 : सर्वत्र मोठ्या दणक्यात बाप्पाचे आगमन झाले आहे.  महाराष्ट्रात सर्वत प्रसन्न आणि मंगलमय वातावरण पहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचा हा उत्साह भर समुद्रातही पहायला मिळत आहे. चीनवरून ब्राझीलच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनवरून ब्राझीलच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला आहे. पारंपारिक पद्धतीने बाप्पाची आरास केली जाते. दररोज सकाळ- संध्याकाळ बाप्पाची मनोभावे आरती केली जाते. सार-एन नावाचे जहाज सध्या चीन वरून ब्राझीलच्या दिशेनं जात आहे. त्यावर मराठमोळे श्रीकांत भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाप्पाला जहाजावर विराजमान केलं आहे. जहाजावर असल्यामुळे गणेशोत्सवाला कुटुंबीयांसोबत सण साजरा करता येत नाही. मात्र, असं असलं तरी जहाजावर असलेल्या मराठी बांधवांनी एकत्र येत गणपती बाप्पाचा जयजयकार केलाय.


दुबईत गणेशोत्सव


MPFS दुबई महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवाचं हे 51 वर्ष आहे. 1973 साली मंडळाची स्थापना शहाणे यांनी केली. तेव्हांपासून ते आजपर्यंत दरवर्षी दुबईतल्या स्थानिक नियंमांचं पालन करत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात,जोशात साजरा केला जातो. गणपतीच्या ५ दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, शास्त्रीय गायन असे कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करून गणपतीची सेवा करतात. ह्या ५ दिवसात एकदा अथर्वशीर्षाचं सहस्त्रावर्तन केलं जातं त्यावेळी सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. ह्या वर्षी आशिष देवधर आणि त्यांची कार्यकारिणी हा वारसा जतन करत गणेशोत्सव साजरा करतायत.


पाकिस्तानातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो असं तुम्हाला सांगीतलं तर आश्चर्य वाटेल ना.. पण हे खरंय.. लाडक्या गणपती बाप्पाची पाकिस्तानातही मोठ्या उत्साहात पूजा केली जाते... पाकिस्तानातील कराची शहरातल्या क्लिफ्टन इथं रत्नेश्वर महादेवाचं मंदिर आहे.. या मंदिरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो..