Gautam Adani : आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी शुक्रवाराचा दिवस हा चढ-उताराचा होता. सकाळी, गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीश निर्देशांकात जगातील दुसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश बनले होते. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार (Forbes real-time Billionaires list), अदानीची एकूण संपत्ती $155 अब्ज पार झाली होती. अदानी समूहाच्या (Adani Group's ) प्रमुखांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. मात्र, काही तासांतच अदानी यांच्या मानांकनात घसरण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअरच्या ताज्या यादीमध्ये, पुन्हा एकदा गौतम अदानी हे जगातील तिसरे श्रीमंत अब्जाधीश बनले आहेत. मात्र, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) गौतम अदानी हे तिसर्‍या क्रमांकावर स्थिर आहेत.  फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग या दोघांचेही संपत्तीचे मूल्यांकन वेगवेगळे आहे.


फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार, दुपारी अदानी यांच्या संपत्तीत $5.5 अब्जची वाढ झाली होती. यामुळे अदानीची एकूण संपत्ती $155.7 बिलियनवर पोहोचली आणि ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले. 



मात्र संध्याकाळी अदानींच्या संपत्तीत $2.2 अब्जची घट झाली आहे. आता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 152.2 अब्ज डॉलर आहे. त्यामुळे आता पुन्हा ते बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या मागे आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती $153.5 अब्ज आहे.