Gautam Adani in Bloomberg Billionaires Index: आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Indian Richest Person) म्हणून ओळख असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका वृत्तवाहिनीला काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीनंतर अदानींची जोरदार चर्चा आहे. आपल्या उद्योग व्यवसायाबरोबरच राजकीय संबंध आणि इतर अनेक गोष्टींबद्दल अदानींनी या मुलाखतीमध्ये रोखठोक मतं मांडली होती. मात्र आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना एक मोठा धक्का बसला असून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अदानींची घसरण झाली आहे. 'ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स'मध्ये (Bloomberg Billionaires Index) त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 91.2 कोटी अमेरिकी डॉलर्सने कमी झाली आहे. त्यामुळे आता अदानींची एकूण संपत्ती 118 अब्ज डॉलर्स इतकी आहे. सन 2022 मध्ये अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये 44 अब्ज डॉलर्सने वाढ झाली. वार्षिक सरासरीच्या आधारे अडाणींच्या एकूण संपत्तीमध्ये 2.44 अब्ज डॉलर्सची पडझड झाली आहे.


जेफ बेजोस यांची झेप आणि अदानींना फटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अ‍ॅमेझॉन'चे (Amazon) संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) हे श्रीमंतांच्या यादीमध्ये गौतम अदानींच्या पुढे निघून गेले आहेत. जेफ बेजोस यांची संपत्ती 5.23 अब्ज डॉलर्सने वाढून 118 अब्ज डॉलर्सहून अधिक झाली आहे. ब्लूमबर्गने जारी केलेल्या जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये फ्रान्समधील उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) 182 अब्ज डॉलर्ससहीत पहिल्या स्थानी आहेत. सन 2022 मध्ये त्यांच्या संपत्तीत 20 अब्ज डॉलर्सने मोठी वाढ झाली.


मस्क दुसऱ्या स्थानी


ट्विटर आणि टेस्लाचे मालिक एलन मस्क (Elon Musk) हे १३२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसहीत श्रीमंताच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. मस्क हे संपत्तीच्याबाबतीत बर्नार्ड यांच्यापेक्षा फारच मागे आहेत. मस्क यांच्या संपत्तीमध्ये एका दिवसात २.७८ अब्ज डॉलर्सने वाढ झाली. मात्र संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास मागील वर्षी मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये 4.84 अब्ज डॉलर्सने कमी झाली. जेफ बेजोस 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसहीत श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. अदानींची संपत्ती बुधवारी 2.44 अब्ज डॉलर्सने कमी झाली आणि ते चौथ्या स्थानावर घसरले. 


अंबानी कितव्या क्रमांकावर?


या यादीमध्ये अमेरिकेतील मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) हे 111 अब्ज डॉलर्ससहीत पाचव्या स्थानी आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) सहाव्या स्थानी आहेत. तर लॅरी एलिसन 98 अब्ज डॉलर्ससहीत सातव्या क्रमांकावर आहे. या शिवाय मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 87.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या संपत्तीसहीत या यादीत आठव्या स्थानी आहेत.