जगाला हादरवणारा वैज्ञानिक रिपोर्ट! `या` कारणामुळे 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती पृथ्वीवरुन नष्ट होणार

जगाला हादरवणारा वैज्ञानिक रिपोर्ट समोर आला आहे. येत्या काही वर्षात 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती पृथ्वीवरुन नष्ट होणार आहेत. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Genetic Diversity has declined globally : क्लायमेट चेंज, ग्लोबल वार्मिंग याचे भविष्यात गंभीर परिणाम पहायला मिळणार आहेत. जगभरात हजारो प्रकारचे पृथ्वीवरुन नष्ट झाले आहेत. यानंतर संशोधकांनी आता जगाला हादरवणारा वैज्ञानिक रिपोर्ट सादर केला आहे. येत्या काही वर्षात 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती पृथ्वीवरुन नष्ट होणार आहेत. यामागचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे.
हे देखील वाचा.... भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाब वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य
सिडनी विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले. 1985 ते 2019 या 30 वर्षांच्या कालावधी दरम्यान 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती यांचे संशोधन करण्यात आले. या संशोधनात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. जे प्राणी, जीव आणि वनस्पती यांचे संशोधन करण्यात आले त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. हे 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती येत्या काही वर्षात पृथ्वीवरुन नष्ट होणार असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला.
या संशोधनात चीन, ब्रिटन, ग्रीस, स्पेन, स्वीडन आणि पोलंड येथील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. पर्यावरणातील बदलांशी जीवांचे अनुकूलन होण्यासाठी अनुवांशिक विविधता अत्यंत महत्त्वाची आहे. जर विविधता राहिली तर जीव सहजपणे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. मात्र, संशोधन करण्यात आलेल्या 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती दोन तृतीयांश प्रजातींची जनुकीय विविधता कमी होत असल्याचे समोर आले आहे.
जमिनीच्या वापरातील बदल, रोग, नैसर्गिक आपत्ती जसे की जंगलातील वणवा, पूर, नद्या आणि हवामानातील बदल तसेच आणि मानवाकडून केली जाणार शिकार, वृक्षतोड अशी विविध कारणे यामागे आहेत सिडनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लाइफ अँड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेसच्या संशोधनाच्या प्रमुख लेखिका कॅथरीन ग्रुबर यांनी सांगितले. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्रजातींचे अस्तित्व वाचवता येवू शकते. यासाठी प्रजातींचे संवर्धन करणे गरजेचे आहे