विमानांची जोरदार धडक कॅमेरात कैद, दोन्ही पायलटचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video
हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही विमानांनी आग लागली
Plane Collide : गेल्या काही दिवसांपासून विमानाचा (Plane Accident) अपघात झाल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. नुकतेच एका अमेरिकन विमानाला आग लागल्याची बातमी आली होती. त्यानंतर फ्रांन्समधील एक विमान धावपट्टीवरून घसरल्यानंतर थेट तलावात पोहोचले होते. अशातच आता जर्मनीतील (Germany) एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये दोन छोट्या विमानांची धडक (Plane Accident) झाली. ही धडक इतकी भीषण होती दोन्ही पायलटचा मृत्यू (Pilot Death) झाला आणि दोन्ही विमाने जळून खाक झाली.
ही घटना जर्मनीच्या (Germany) लेमनिज एअरफील्डची आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, दोन्ही विमानांचे पायलट एका विशिष्ट पॅटर्नसाठी प्रशिक्षण घेत असताना हा सर्व प्रकार घडला. दोन्ही वैमानिक 'मिरर फ्लाइट'चे प्रशिक्षण घेत होते. यादरम्यान दोन्ही विमाने एकमेकांना समांतर उड्डाण करत होती. दरम्यान, अचानक दोन्ही विमाने समोरासमोर आली आणि एकमेकांवर आदळली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. (Two Plane Collide in Sky Pilot Death)
माध्यमाच्या वृत्तानुसार, दोन्ही विमानांची धडक होताच अचानक आग लागली आणि दोन्ही विमाने जमिनीवर पडली. विमाने खाली पडताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र यादरम्यान अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्याने दोन वैमानिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला.
दरम्यान, दोन्ही पायलट त्यांच्या विमानासोबत एरोबॅटिक्सचे प्रशिक्षण घेत होते. ही संपूर्ण घटना शनिवारी सायंकाळी घडली. दोन्ही विमाने आकाशात सराव करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर अचानक दोघांची धडक झाली. धडकेनंतर दोन्ही विमाने एकमेकांत अडकली आणि जमिनीवर कोसळली.