गिलगिट-बाल्टिस्तान आमचा अविभाज्य भाग, भारताचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानच्या या निर्णयाविरूद्ध भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाविरूद्ध भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे. पीओकेमध्ये कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही, असे सांगत भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हादेखील भारताचा अविभाज्य भाग असल्याचं भारताने म्हटलं आहे.
इम्रान खान सरकार या महिन्यात या प्रांतात विधानसभा निवडणुका घेण्याच्या तयारीत आहे. चीनचं कर्ज आणि दबावानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचा विश्वास आहे. पाकिस्तानला भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. असं देखील भारताने म्हटलं आहे.
गिलगिट-बाल्टिस्तान हा पाचवा प्रांत म्हणून पाकिस्तानने जाहीर केलं आहे. इस्लामाबाद येथे आयोजित 73 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याची घोषणा केली.