श्रीलंका - 70 वर्षांच्या इतिहासात श्रीलंकामध्ये सर्वात वाईट आर्थिक संकट कोसळलं आहे. गगनाला भिडलेल्या महागाईमुळे स्थानिकांना अन्न, औषध, पेट्रोल आणि डिझेल इत्यादी मूलभूत गरजांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो आहे. अशातच श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीलंकेत सर्वत्र निदर्शने आणि हिंसाचार पाहिला मिळतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांमध्ये श्रीलंकामध्ये सरकारविरोधात लोकं रस्त्यावर उतरली आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही दाखवलं होतं की संतप्त लोकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला होता. असंख्य लोक राष्ट्रपती भवनात खूप मजा करताना दिसली. काही जण तर स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होती. तर काही जण बिर्याणीवर ताव मारत होती. येवढंच नाही तर काही जणांनी बेडरूमचा कब्जा घेतला होता. पण या सगळ्या एन्जॉयमेंटमध्ये राष्ट्रपती भवनातील 'ती' तरुणी सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं घेत आहे.  


काय केलं 'या' तरुणीने?



राष्ट्रपती भवनात असंख्य लोक मस्ती करत असताना तिथे एक तरुणी ड्रेसअप होऊन येते. त्यानंतर तरुणीने या गोंधळात राष्ट्रपती भवनातील वेगवेगळ्या जागी स्पेशल फोटोशूट केलं. या तरुणीने थोडे थोडके नाही तर तब्बल 26 फोटो क्लिक केले. या तरुणीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिने यूजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. Maduhansi Hasinthara असं या तरुणीचं नाव आहे. 


या तरुणीने 13 जुलैला फेसबुकवर हे फोटो शेयर केले. त्यानंतर आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर 9 हजार लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर दीड हजारांपेक्षा जास्त यूजर्सने कमेंट्स केले आहेत. एक यूजर म्हणतो, ''ही मुलगी श्रीलंकेची नवीन राष्ट्रपती होऊ शकते.'' तर एक यूजर म्हणतो, ''गोंधळ सुरु असताना फोटोशूट करण्याचं असं वेड कधी पाहिलं नाही.''