चालत्या कारमध्ये तिने केलं असं काही, व्हिडिओ व्हायरल
टॅक्सी चालकाने प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. यामुळे वाहनचालकांच्या विश्वसनीयतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
अमेरिका : टॅक्सी चालकाने प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. यामुळे वाहनचालकांच्या विश्वसनीयतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
मात्र, कधी-कधी याच्या उलटं झाल्याचं पहायला मिळतं. सध्या सोशल मीडियात असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुणी असं काही कृत्य करते की जे पाहून सर्वांनाच एक धक्का बसला.
व्हायरल झालेला व्हिडिओ हा अमेरिकेतील ब्रुकलिनमधील असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एका कॅबमध्ये दोन मुली आणि एक तरुण बसलेला आहे तर कॅब ड्रायव्हर गाडी चालवत आहे. काही वेळात गाडीत मध्यभागी बसलेली तरुणी कॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या टीप बॉक्समधील पैसे चोरी करते.
यानंतर कॅब थांबल्यानंतर ते तिघेही गाडीतून उतरुन पळ काढतात. या तरुणींने केलेलं कृत्य कॅबमधील कॅमेऱ्यात केद झालं. या तरुणींचं वय १८ वर्ष असल्याचं बोललं जात आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या तरुणीचं नाव गैब्रिएल कैनालेस असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर कॅब चालकाने या घटनेची माहिती आपल्या कंपनीला दिली आहे. ही कॅब उबर कंपनीची होती.
हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.