International Crime News : जगभरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. असे असताना देखील अनेक विद्यार्थी लपवून मोबाईल शाळेत घेवून जातात. अशा विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त केले जातात तसेच त्यांना शिक्षा केली जाते. शाळेत शिक्षकांनी मोबाईल काढून घेतला म्हणून एका विद्यार्थ्याने कुणी कल्पनाही करु शकत नाही असे धक्कादायक कृत्य केले आहे. दक्षिण अमेरिकेतील गयाना देशात ही घटना घडली आहे. मुलानी केलेल्या या कृत्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ती स्वत: देखील गंभीर जखमी झाला आहे. 


नेमका काय आहे प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेत हंगामा करणाऱ्या या विद्यार्थ्यीनीला लवकरच अटक केली जाणार आहे. आरोपी विद्यार्थीनी हा 14 वर्षांचा आहे. ती इयत्ता नववीमध्ये शिकत आहे.  राजधानी जॉर्ज टाउन से लगभग 200 मील की दूरी पर सेंट्रल गुयाना माइनिंग टाउन मध्ये ही घटना घडली आहे. ही मुलगी महदिया सेकेंडरी स्कूलमध्ये  (Mahdia Secondary School)  ती शिकत होती. शाळेजवळ असलेल्या शाळेच्या हॉस्टेलमध्येच ता राहत होती. 


हॉस्टेलला आग लावली


डेली स्टारने याबबतचे वृत्त दिले आहे. हॉस्टेलला आग लागल्याची घटना घडली होती. तपासात या मुलीनेच हॉस्टेलला आग लावल्याचे उघड झाले. शाळेत शिक्षकांनी या मुलीचा मोबाईल काढून घेतला होता. तसेच मोबाईल आणला म्हणून शिक्षक तिला ओरडले देखील होते. शिक्षक ओरडल्याने ही मुलगी खूपच चिडली होती. 


आधीच दिली होती धमकी


शिक्षकांनी मोबाईल घेतल्याने या मुलीला खूपच राग आला होता. तिने शाळेला तसेच हॉस्टेलला आग लावण्याची धमकी दिली होती. मात्र, शिक्षकांनी तिच्या धमकीचे गांभीर्य घेतले नाही. शाळेतून हॉस्टेमध्ये आल्यावर या मुलीने हॉस्टेलमध्ये आग लावली. या आगीत हॉस्टेलमधील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश 12 ते 18 वयोगटातील मुलींचा समावेश आहे.


शाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा पाच वर्षांच्या मुलाचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत ही मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे. आगीचे वृत्त समजताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. आणखी विद्यार्थी यात जखमी झाले आहेत. हे कृत्य करणाऱ्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला रुग्णालयातून सोडल्यावर तात्काळ तिला अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.