बिजिंग: एखाद्या सिनेमात मुलीचं डोकं पुढे आलेलं किंवा उलटं दिसतं अगदी तसाच प्रकार समोर आला आहे. सिलिंगवरून डोकं खाली आलेलं दिसलं आणि लोक घाबरले. सिलिंगवरून मुलीचं डोकं उलटं बाहेर आलेलं दिसलं. त्यामध्ये कसंही उलटे झालेले होते. हा सगळा प्रकार पाहून सोशल मीडियावर युझर्सच्या काळजाचा ठोका चुकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुलीचं डोकं सिलिंगच्या एका होलमध्ये अडकलं आहे. याची माहिती जेव्हा तिच्या पालकांना कळली तेव्हा त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. सुरुवातीला हा प्रकार पाहून तेही घाबरले होते. मात्र त्यांना नंतर सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीनं बचावकार्यासाठी मदत मागितली.


चीनच्या साऊथवेस्ट भागात गुइझोड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. एखाद्या हॉरर सिनेमापेक्षाही या मुलीच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कमी नव्हता. या मुलीला वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार घराच्या पहिल्या मजल्यावर एका फॅन बसवण्यासाठी छेद करण्यात आला होता. मुलीला याची कल्पना नव्हती. 


या मुलीनं उत्सुकतेपोटी त्या होलमध्ये आपलं डोकं घातलं खरं पण ते काही केल्या पुन्हा बाहेर येईना. मुलीचं डोकं अडकलं आणि त्यानंतर हा सगळा थरार समोर आला.  तिने डोकं बाहेर काढायचा प्रयत्न केला मात्र डोकं विचित्र पद्धतीनं अडकलं होतं. अखेर बचाकार्य करणाऱ्या टीमची मदत घ्यावी लागली. 
मुलीला संकटात सापडलेलं पाहून आईवडिलांचा जीव कासावीस झाला. त्यांनी तेलाचा वापर करून आणि मशीच्या सहाय्याने भिंत फोडून या चिमुकलीचा जीव वाचवला आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच युझर्सच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र व्हिडीओमुळे या फोटोमागचं सत्य समोर आलं आहे. त्यामुळे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर काळजी घ्या.