जर्मनी :  जर्मनीतील एका महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. यामहिलेनं आपल्या फायद्यासाठी आपल्या बॉयफ्रेंडसोबत असा काही खेळ खळला की, अखेर ती स्वत:च त्यामध्ये फसली. आता ही महिला लैंगिक अत्याचारा प्रकरणी सहा महिन्यासाठी तुरुंगात आहे. डॉयचे वेले (DW) या वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या कंडोमला लहान छिद्र केले, ज्यामुळे ती प्रेग्नेट होणार होती. परंतु प्रेग्नेंट होणं हे, या महिलेचं लक्ष नव्हत, तर तिचा प्लान काही वेगळाच होता, जो सर्वांसाठीच धक्कादायक आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


या प्रकरणात एका ३९ वर्षीय महिलेचं एका ४२ वर्षीय पुरुषासोबत अनौपचारिक संबंध होते. दोघे एकावर्षापूर्वी ऑनलाइन भेटले होते. त्यांनी यापूर्वच ठरवलं होतं की, या रिलेशनशिपमध्ये ते कायमचे नसतील, हे नातं फक्त काही दिवसांसाठीच असेल. परंतु नंतर एक काळ असा आला की, ही महिला या तिच्या या पार्ट टाईम बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली आणि तिने संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा विचार केला.


परंतु तिचा बॉयफ्रेंड त्यांच्या या नात्याबद्दल सिरिअस नव्हता, ज्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी या महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडच्या कंडोमला छिद्र पाडले. परंतु तिने केलेला प्लान यशस्वी ठरला नाही.


महिलेने त्या पुरुषाला मेसेज पाठवला की तिला विश्वास आहे की ती गर्भवती आहे. या महिलेने पुरुषाला हे देखील सांगितले की, त्याने जाणूनबुजून कंडोम खराब केला आहे. यानंतर त्या बॉयफ्रेडंनं या महिलेवर विनयभंगाचा आरोप केला आणि नंतर महिलेनं देखील ते कोर्टात मान्य केले. ज्यानंतर या महिलेला शिक्षा सुनावण्यात आली आहे.