क्वालालंपूर : मलेशियातील एक मशिदीत एक अजब प्रकार समोर आला आहे. मशिद हे मुसलमानांचे पवित्र स्थान. या पवित्र स्थानी तंग कपड्यांमध्ये दोन महिला नृत्य करत होत्या. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. कोटा किनाबालु शहारातील या मशिदीच्या बाहेरच्या एका भिंतीवर तंग कपड्यांमध्ये दोन महिला नृत्य करत होत्या. त्यांचा व्हिडिओ बनवण्यात आला. 


बघ्यांची टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नृत्य पाहत असलेल्या एका बघ्याने म्हटले आहे की, या महिला भिंतीवरुन पडल्या का नाहीत? व्हिडिओत हे ऐकू येते.



पर्यटकांवर बंदी


या घटनेनंतर मशिदीचे प्रमुख जमाल साकरन यांनी परदेशी पर्यटकांच्या अशा वागणूकीवर टीका केली आहे. त्याचबरोबर साबाह राज्यातील मशिदीत पर्यटकांना जाण्यास अस्थायी बंदी घालण्यात आली आहे. याचा एक उद्देश इस्लामची पवित्रता राखणे हे असल्याचे त्यांनी सांगितले. पण या घटनेला कारणीभूत असलेल्या या महिला नेमक्या कोणत्या देशाच्या आहेत, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.


त्या मात्र अज्ञात


राज्य पर्यटनमंत्री क्रिस्टिना लीव यांनी 'द स्टार' या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, या जोडीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. कारण त्या आपल्या चुकीबद्दल अज्ञात होत्या. या महिलांना त्या करत असलेल्या वर्तवणूकीबद्दल कोणतीही समज नव्हती. त्या फक्त मज्जा करण्याच्या उद्देशाने नृत्य करत होत्या. 


असा सल्ला


मुस्लिम देश मलेशियात पर्यटक अधिकतर मशिदीला भेटी देतात. देशात इस्लामच्या उदार रुपाचे पालन केले जात असेल तरी येथे शालीन कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.